ताज्या घडामोडीपिंपरी

उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी आपत्ती प्रतिसाद पथकाच्या वाहने लोकार्पण

Spread the love

 

पीएमआरडीएच्या माध्यमातून पीडीआरएफची स्थापना

पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जिल्ह्यातील भुशी डॅम दुर्घटना, पुणे शहरातील पूरपरिस्थिती आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा हवी. या संकटांमध्ये त्वरित मदतीसह बचाव कार्य सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) स्थापन करण्यात आले असून पथकाच्या वाहनांचे लोकार्पण मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अज‍ित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.

पुणे महानगर प्रदेश व‍िकास प्राध‍िकरणाच्या विस्तृत कार्यक्षेत्रातील डोंगराळ भाग, जुन्या इमारती, धरणे, तलाव आणि महामार्गांवरील दुर्घटनांच्या संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) जलद प्रतिसाद देणारी आणि अत्याधुनिक संसाधनांनी सज्ज असलेली यंत्रणा असणार आहे. पीडीआरएफसाठी शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रारंभी यासाठी ३० प्रशिक्षित जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा. पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकाप्रमाणेच पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (PDRF) स्थापन करण्यात आले आहे.

या पथकासाठी ३२ आसनी ट्रप कॅरियर बस, टेम्पो आणि पिक-अप व्हॅन अशी अत्याधुनिक वाहने खरेदी करण्यात आली असून, त्यांचे लोकार्पण शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनान‍िम‍ित्त आयोज‍ित कार्यक्रमात मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अज‍ित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश व‍िकास प्राध‍िकरणाचे महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अध‍िकारी डॉ. योगेश म्हसे, ज‍िल्हाध‍िकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे मुख्य अग्न‍िशमन अध‍िकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह अध‍िकारी, मान्यवर उपस्थ‍ित होते.

प्रभावी आपत्ती व्यवस्थापनावर भर
भविष्यात पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाला (PDRF) अध‍िक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापन धोरणे राबवली जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश व‍िकास प्राध‍िकरण, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने पीडीआरएफ आगामी काळात देशातील आपत्ती व्यवस्थापनात एक आदर्श मॉडेल ठरणार आहे.

पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाची आवश्यकता
पीएमआरडीए क्षेञातील नागर‍िकरणामुळे लोकसंख्या वाढत असून औदयोगिक, वाणिज्य, रहिवासी, अश्या इमारतींची संख्या जास्त आहे. प्राधिकरण क्षेञात आपत्तीचा सामना करण्यासाठी प्राधिकरणाचे अग्निशमन दल अस्तित्वात असून त्यांना मदत करण्याकरीता मदत व बचाव पथकांची आवश्यक होती. इमारत कोसळणे, अपघात, अतिवृष्टी आदीसारख्या घटना घडल्यास अशा वेळेस राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकास (NDRF) पाचरण केले जाते. परंतू, घटनेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी एनडीआरएफला काही अपिहार्य कारणामुळे विलंब होत असल्याने विमोचनच्या गोल्डन अवर्समध्ये ब-याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपातकालीन पर‍िस्थ‍ितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर आधारीत राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाप्रमाणेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाची (PDRF) स्थापना करण्यात आली.

पीडीआरएफ पथक स्थापन करण्याचा उदेश
प्राध‍िकरणाच्या भौगोलिक परिस्थितीमधील आव्हाने लक्षात घेता नागरिकांना राहण्याकरीता सुरक्षित व आपत्ती व्यवस्थापन सक्षम असावे, यासाठी अग्निशमन दलाच्या मदतीकरीता पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून अत्यंत कुशल पध्दतीने विमोचन, मदत व पुर्नवसन कार्य, नियमित आणि कठोर प्रशिक्षण, पुर्नप्रशिक्षण, सराव, विविध कवायती, जनजागृती, जबाबदार असणा-या कार्यक्षेञात क्षमता पूर्नबांधणी, विविध यंञणांबरोबर एकञितरित्या रंगीत तालीम आदी प्रस्ताव‍ित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button