श्री आनंद पार्श्व गुरुकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन


अहिल्यानगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जानेवारी रोजी केडगावमध्ये स्थित, अकोळनेर रोड वरील आनंद नवकार परिवार ट्रस्ट संचालित श्री आनंद पार्श्व गुरुकुलाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन (दि. 19 जानेवारी )राष्ट्रसंत ,आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषीजी म. चे अंतर सुशीष्य श्रमण संघीय युवाचार्य परमपूज्य श्री महेंद्रऋषीजी म, महाराष्ट्र प्रवर्तक प पू श्री कुंदनऋषीजी म. इत्यादी संत – सती वृंदांच्या पावन सानिध्यात, हजारो श्रावक – श्राविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला . सर्वप्रथम श्री हितेंद्रऋषीजी म. श्री आलोकऋषीजी म. यांचे मंगलाचरण व स्त्रोत पठण केले.



श्री आनंद पार्श्व गुरुकुलाच्या मुला – मुलींनी स्वागत गीत प्रस्तुत केले . साध्वीजी श्री नाव्याजी म. यांनी युवाचार्यश्रीजी व प्रवर्तकश्रीजी यांचे स्वागत व गुरुकुलाचे महत्व एका भजनाद्वारे प्रस्तुत केले. उपप्रवर्तिनी श्री रिद्धीमाजी म. व श्री आराधनाजी म. यांनी गुरुकुलाचे महत्व तसेच प्रवर्तकश्रीजी श्री आलोकऋषीजी म.स यांच्या कार्याचे गोड कौतुक केले. डॉ. श्री पुण्यशिलाजी म. यांनी काळाची गरज गुरुकुल या विषयावर भजनाद्वारे प्रकाश टाकला . डॉ. श्री जोस्नाजी म. यांनी संस्कार काळाची गरज आहे सांगून हे गुरुकुल खूप मोठी भरारी घेईल असे आपल्या भाषणातून सांगितले. स्कूल कमिटी मेंबर सौ मेघा बोरा यांनी शाळेची माहिती देऊन , मुलांच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली. दोन पालकांनी आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकास हेतू प्रिन्सिपल, टीचर्स एवं शाळेचे खूप अभिनंदन केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेची स्थापने पासून ची माहिती सांगुन संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व आनंद पार्श्व गुरुकुल च्या स्थापने मागील उद्देश सांगितले.

गुरुकुलाचे प्रमुख सहयोगी दानवीर श्री रमणलालजी लुंकड (औंध, पुणे ) गुरुकुल चे उद्घाटक श्री अशोकजी कटारिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्रीमती सुजाता राजेंद्रजी लोढ़ा (अ नगर) , संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक जी पारख (अ. नगर)डॉ .श्री प्रकाशजी, सौ सुधाजी कांकरिया, (अ.नगर) , सीए .श्री रवींद्रजी कटारिया ( अ.नगर ) सौ मंजू सुनीलजी मुनोत (अ.नगर ) , श्री सुनीलजी ओस्तवाल (कारेगाव) यांचा हार व मोमेंट देऊन ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री आलोकऋषीजी म. यांनी सांगितले की , ही सर्व कृपा आनंदबाबांची व तपस्वी मगनमुनिजी म. यांची आहे . प्रवर्तक श्री कुंदनऋषीजी म यांची सतत प्रेरणा , युवाचार्यश्रीजी व प्रवृद्ध विचारक आदर्शऋषीजी म. यांचे मार्गदर्शनाने तसेच संस्कार ,सेवा , शिक्षा यांच्या त्रिवेणी संगमाने गुरुकुल उंच भरारी घेत आहे. श्री हितेंद्रऋषीजी म. यांनी सांगितले की कमीवयात श्री आलोकऋषीजी म. हे गुरुदेवांचे स्वप्न साकार करत आहे. प्रबुद्ध विचारक पू श्री आदर्शऋषीजी म यांनी सांगितले की , शिक्षण हे अंधकारपासून प्रकाशाकडे गतिशील राहण्याचा मार्ग आहे. गुरुकुल चे कार्य प्रगतीपथावर निरंतर गतिमान राहो अशी सद्भावना त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली.
प्रवर्तकश्रीजीने संगीतले कि,णाण हे मनुष्याचे तिसरे नेत्र आहे. जैन समाजाच्या प्रत्येक मुला – मुलींनी या गुरुकुलमध्ये प्रवेश घेऊन यांच्या भविष्यात बाबत निश्चित व्हावे असे संगीतले. श्रमण संघीय युवाचार्य श्री महेंद्रऋषीजी म. यांनी ज्ञानाचे खुप महत्त्व आजच्या युगात आहे , असे सांगितले . आजच्या युगात ज्ञान मंदिराची , आरोग्याच्या मंदिराची नितांत आवश्यकता आहे असे ते म्हणाले .
दीक्षार्थी श्री शिवम बाफना ( वडगाव मावळ ) तसेच वैरागवती कुमारी जीया व कुमारी खुशी जैन यांचे भव्य स्वागत ट्रस्ट व कमिटीच्या सदस्यांनी केले.
मद्रास , बेंगलोर , मध्यप्रदेश , मुंबई ,महाराष्ट्र इत्यादी स्थळांवरून लोक हजारांच्या संख्येत उपस्थित होते. अशी माहिती आनंद नवकार परिवार ट्रस्ट , सलाहकार कमिटी व विश्वस्त मंडळ व स्कूल कमिटी कडून देण्यात आली. सर्वांनी या गुरुकुलात प्रवेश निश्चित करावा असे नम्र निवेदन करण्यात आले आहे.
सांसद (खासदार ) श्री निलेशजी लंके श्री विजयकांतजी कोठारी ,श्री पोपटलालजी ओस्तवाल ,श्री राजकुमारजी चोरडिया ,नगरसदस्य श्री विपुलजी शेटीया, संजयजी चोपडा श्रीमती सुजाता राजेंद्रजी लोढा, , श्री पारसजी मोदी ,श्री अविनाशजी चोरडिया, श्री रमेशजी फिरोदिया, श्री किरणजी बोरा, डॉ. श्री प्रकाशजी, डॉ. सौ सुधाजी कांकरिया, , श्री राजेंद्रजी कोठाडीया , श्री पेमभाऊ बोथरा , श्री रवींद्रजी कटारिया , श्री आनंदरामजी मुनोत, श्री विलासजी राठोड ,श्री शांतीलालजी बोरा , श्री दिपकजी मुनोत (पत्रकार), श्री सतिश लोढा, श्री नितीनजी बेदमुथा, श्री विलासजी पगारिया, श्री विकासजी कांकरिया,रुचिरा सुराणा , विमला बाफना, लता पगारिया ,नितल फुलफगर शैलेशजी पगारिया, श्री विजयजी ओस्तवाल, श्री सुरेशजी पीचा , संतोषजी बोथरा, श्री राजेंद्रजी बोरा, श्री अशोक मोहनलालजी भंडारी, , श्री विलासजी मुथा इ. मान्यवर उपस्थित होते. आर्किटेक श्री किरण कांकरिया, इंजिनिअर श धनेश मुनोत, श्री गुलाटी, श्री सचिन डागा उपस्थित होते.
गौतम प्रसादीची व्यवस्था अलकाबाई सूनिलजी कांकरिया (कोल्हार भ ) श्रीमती मंगलाबाई नंदकुमारजी राका (चिंचोली फाटा ), श्रीमती प्रमिलाबाई वसंटलालजी भटेवरा ( कोल्हार भ – राहू) करण्यात आली होती.
आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सीए .श्री मोहनलालजी बरमेचा (अहमदनगर ) यांनी केले. प्रा डॉ. श्री अशोकजी पगारिया सर व श्री प्रसाद बेडेकर सर यांनी सूत्र संचालन सुंदर रीतीने पार पाडले.
संस्थेचे विश्वस्त व स्कूल कमिटीचे श्री राजकुमार लुनिया, श्री सुनीलजी बाफना, महेश मुथियान , मनोज शेटिया , संदेश लोढा, राजेंद्रजी छल्लाणी , राजेंद्र चोपडा , प्रितेश दुगड, ईश्वर धोका, संतोष बाफना, सुदर्शन डूगरवाल , सचिन बोरा, गणेश आनंद शिंगी, रोशन चोरडिया, मेघा बोरा, श्रीमती इच्चाबाई बोरा, प्रिन्सिपॉल मोना मॅडम, ज्योती पुरी मॅडम इ. चा भरपूर सहयोग मिळाला.








