ताज्या घडामोडीपिंपरी

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘यशस्वी भव’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची भीती घालवण्याच्या उद्देशाने स्टेप्स फाउंडेशन, गुरुकुल फाउंडेशन, लायन्स क्लब पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्तपणे ‘यशस्वी भव’ या मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे मार्गदर्शन शिबीर येत्या २९ जानेवारी रोजी ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दल असणारी भीती, गणित व विज्ञान या विषयांमध्ये घ्यायची काळजी, परस्पर संवादी सत्रामधून विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण याबाबत परीक्षा मंडळातील तज्ज्ञ शिक्षक, तसेच मानसशास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची गुण व गुणवत्ता कशी वाढेल, हा उद्देश असणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी मोफत महत्वाचे व बहुपर्यायी प्रश्नसंच मोफत देण्यात येणार आहेत.
या शिबिरात डॉ. संतोष पाचपुते, डॉ. शोभना पवार, प्रा. मनोज चोधरी, प्रा. ओमप्रकाश मारे, प्रा स्वाती विठुळे, प्रा. नीलम कौशल, प्रा. संदेश मुखेडकर आदी मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मा एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष जागृती देशपांडे, लायन विजय सारडा, लायन्स क्लब पुणे इनोवेशनचे अध्यक्ष लायन गोपाल बिरारी, कार्यक्रमप्रमुख लायन संदीप पोलकम, सचिव लायन किशोरी हरणे, खजिनदार लायन एकनाथ चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button