Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या तर्फे तिरंगा जीनियस एशिया अवॉर्ड व तिरंगा जीनियस एशिया स्टुडन्ट अवॉर्ड 2025 चे आयोजन मास्टर माईंड स्कूल, भोसरी येथे 26 जानेवारी रोजी भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमात समाजात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले, अशा सर्वांचा आणि काही निवडक शाळेतील विद्यार्थ्यांचा तिरंगा जीनियस एशिया अवॉर्ड व तिरंगा जीनियस एशिया स्टुडन्ट अवॉर्ड या पुरस्कारांनी प्रसिद्ध सिने अभिनेते जगदीश चव्हाण व इरफान सय्यद, कामगार नेते यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजस्विनी वेताळ, अभिनेत्री स्वाती शहा, योगेश गोंधळे (अध्यक्ष सुमित्रा बँक), सुनील हिरूरकर (सहाय्यक आयुक्त,…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज (२८ जानेवारी २०२५) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार/ छायाचित्रकार यांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली. जेष्ठ अधीस्वीकृती पत्रकार कार्ड व आयकर भरावा लागत नाही या दोन कागदपत्रकारांच्या आधारे पेन्शन प्रकरणे मंजूरीचा निर्णय मंत्रालयीन अधिस्वीकृती समितीने घ्यावे असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेंतर्गत १८६ पत्रकारांना पेन्शन योजना सुरू आहे. या योजनेकरिता ५० कोटींची तरतुद करण्यात आली असून दरम्यान, जेष्ठ अधिस्वीकृती पत्रकारांना पेन्शन योजनेचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील गरीब, गरजू एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘ज्ञानदान व वही – पुस्तक दान श्रेष्ठ दान’ या उपक्रमांतर्गत मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांसह इतर शालेय साहित्य वाटप करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील डोणी तिरपाड, नान्हवडे, आहुपे या आदिवासी भागातील वाड्या वस्त्यांमधील एक हजार विद्यार्थी व विद्यार्थिनीना शालेय साहित्याचे वाटप व दहावीतील विद्यार्थ्यासाठी २१ अपेक्षित प्रश्न संच, तसेच पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बालवाडी ते इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण नृत्यगीतांच्या प्रभावी सादरीकरणातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील समृद्ध संस्कृतीचे नयनरम्य दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. यासाठी पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूल अर्थात वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणीनगर, भोसरी या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे निमित्त होते. अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या समारंभात पिंपरी – चिंचवड महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संगीता बांगर, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, माजी आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, आकांक्षा फाउंडेशनचे आकाश गोरे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, आनंद…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लायन इंटरनॅशनल (प्रांत ३२३४ डी – २) आणि पनराज पुखराज सोनिगरा फाउंडेशनच्या वतीने प्रांतपाल लायन विजय सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९:३० ते दुपारी ०३:०० या कालावधीत मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) आणि मोफत हात, पोलिओ कॅलिपर्स व कुबड्या वाटप शिबिराचे आयोजन निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले आहे, अशी माहिती उपक्रम प्रमुख लायन राजेंद्र काळे यांनी दिली. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या लोकांचे विविध कारणांनी आणि अपघातात पाय गमावले आहेत, ज्या व्यक्तींचे कारखान्यात अथवा शेतात काम करताना कोपर्‍यापासून हात गमावले आहेत त्यांना सेन्सरसह मशीन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पवनाथडी जत्रा २०२४-२५ उपक्रमाचे आयोजन करणे, सन २०२५-२६ या सरकारी वर्षाकरिता करांचे व करेत्तर बाबींचे दर निश्चिती करणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. समाजविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचत गट आणि बचत गटातील महिलांनी…

Read More

पीसीयूमध्ये एनआयपीएम ची शाखा सुरू पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटची (एनआयपीएम) पिंपरी चिंचवड विद्यापीठातील शाखा मानव संसाधन व अन्य व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देईल. विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रमुख मानव संसाधन अधिकारी यांच्याशी व्यावसायिक संपर्क वाढविण्यास मार्गदर्शन व मदत करेल. या उद्योग प्रेरित उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळतील व व्यावहारिक ज्ञान, कौशल्यात सुधारणा होतील. ज्यामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढेल व स्पर्धात्मक जगात आणखी पुढे जाण्यास मदत होईल असे प्रतिपादन पीसीयु मधील एनआयपीएम चे अध्यक्ष कल्याण पवार यांनी केले.      पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत सध्या मालमत्ताकर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू असून थकबाकीदारांच्या थकीत रकमेवर प्रतिमहिना २ टक्क्यांचा विलंब दंडही वाढत आहे. त्याबरोबरच ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाईही सुरू आहे. यामुळे करसंकलन विभागाकडून नागरिकांनी कर भरण्यासाठी रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून आवाहन करावे. यासाठी ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालमत्ताकर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी करसंकलन विभागाने लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे. जे रीलस्टार, संगीतकार, रॅपर असतील, अशांनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र व्यापक प्रमाणात असल्यामुळे काही वेळा नागरिकांना अडचणी येतात. त्या तातडीने दूर व्हाव्यात यासह कामकाजात सुलभता येण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी परवानगी विकास विभागातील कामकाजाचे विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे निश्चितच नागरिकांचा वेळ वाचणार असून यापूर्वी पीएमआरडीएमध्ये अशा प्रकारचे महानगर आयुक्तांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण कधीही झाले नव्हते, हे विशेष. यासह नागरिकांना काही अडचणी असतील तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात पीएमआरडीयातर्फे शासनाच्या शंभर दिवसांसाठी सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पीएमआरडीएच्या विकास परवानगी…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयातर्फे (दिनांक २८) “वेळेचे व्यवस्थापन व निर्णय घेण्याची कला” या विषयावर  शमिका कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सौ. कुलकर्णी यांनी जीवनातील वेळेचे महत्व समजून घेऊन वेळेचा सदुपयोग कसा करावा,वेळेचे व्यवस्थापन कसे करावे तसेच आपले निर्णय घेतांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात,निर्णय क्षमता कशी वाढवावी हे विद्यार्थ्याना उदाहरणांसह सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्साह दर्शवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रथम वर्षाचा विद्यार्थी ऋतीक कांबळे याने केले.कार्यक्रमाचे नियोजन प्रा.अंकिता व्हटकर यांनी…

Read More