ताज्या घडामोडीपिंपरी
३१ जानेवारीला लायन इंटरनॅशनलच्या वतीने मोफत कृत्रिम पायरोपण आणि कुबड्या वाटप शिबिर


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लायन इंटरनॅशनल (प्रांत ३२३४ डी – २) आणि पनराज पुखराज सोनिगरा फाउंडेशनच्या वतीने प्रांतपाल लायन विजय सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९:३० ते दुपारी ०३:०० या कालावधीत मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) आणि मोफत हात, पोलिओ कॅलिपर्स व कुबड्या वाटप शिबिराचे आयोजन निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात करण्यात आले आहे, अशी माहिती उपक्रम प्रमुख लायन राजेंद्र काळे यांनी दिली.
गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या लोकांचे विविध कारणांनी आणि अपघातात पाय गमावले आहेत, ज्या व्यक्तींचे कारखान्यात अथवा शेतात काम करताना कोपर्यापासून हात गमावले आहेत त्यांना सेन्सरसह मशीन ऑपरेटेड कृत्रिम हात पुरवण्यात येणार आहेत. यासाठी शिबिरात येणाऱ्या व्यक्तींच्या पायाचे आणि हाताचे माप अगोदर घेण्यात येईल. इच्छुक व्यक्तींनी त्यासाठी बुधवार, दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी भारत डायग्नोस्टिक्स, राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा, पुणे किंवा गुरुवार, दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० ते ०३:०० या कालावधीत मोरया हॉस्पिटल, चापेकर चौक, पी. सी. एम. टी. बस स्टॉपसमोर, चिंचवड येथे माप द्यावे, असे आवाहन लायन राजेंद्र काळे (भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२५२८९४९), लायन सुनील सुखात्मे (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२०२५१८७) लायन जयंता येवला (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२५२३३८९), लायन नेमिचंद बोरा (भ्रमणध्वनी क्रमांक ९३७०१४८१५१) किंवा लायन सतीश देशमुख (भ्रमणध्वनी क्रमांक ९०११००२९९७)
यांनी केले आहे.








