ताज्या घडामोडीपिंपरी

“तिरंगा जीनियस एशिया अवॉर्ड 2025 व तिरंगा जीनियस एशिया स्टुडंट्स अवॉर्ड भोसरीत भव्यदिव्य स्वरूपात संपन्न”

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या तर्फे तिरंगा जीनियस एशिया अवॉर्ड व तिरंगा जीनियस एशिया स्टुडन्ट अवॉर्ड 2025 चे आयोजन मास्टर माईंड स्कूल, भोसरी येथे 26 जानेवारी रोजी भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमात समाजात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले, अशा सर्वांचा आणि काही निवडक शाळेतील विद्यार्थ्यांचा तिरंगा जीनियस एशिया अवॉर्ड व तिरंगा जीनियस एशिया स्टुडन्ट अवॉर्ड या पुरस्कारांनी प्रसिद्ध सिने अभिनेते जगदीश चव्हाण व इरफान सय्यद, कामगार नेते यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजस्विनी वेताळ, अभिनेत्री स्वाती शहा, योगेश गोंधळे (अध्यक्ष सुमित्रा बँक), सुनील हिरूरकर (सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड), आसिफ खान (प्रसिद्ध उद्योजक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन फिरोज खान व सुनील साठे यांनी केले.

राम डी मुदगल, किरण माने, शिवांगी शर्मा, शितल मारणे, सविता शिराळे, श्रीधरण तंबा, रफिक शेख, सुदेश गायकवाड, सुद्धा खोले, ऋषिकेश बारटेकी, दीपक कोहकडे, संजय मराठे, सुधीर गडलिंग, प्रियंका चौहान, हेमराज थापा, काळूराम लांडगे, विष्णू पाटील मनोहरराव, जागृती धर्माधिकारी, विकास खांदवे, सागर रसाळ, संतोष मुळे, दस्तगीर मणियार, कमलेश स्वामी, महेश मनगावडे, भरत वाल्हेकर, पलवी पाटील, राजू मचे, राजू कोतवाल, डॉ राज खतीब, मनीषा जाधव, मनोज साळवे, श्रीनिवास दुधाने, डॉ. प्रदीपा नायर, श्याम सहानी, दस्तगीर मणियार, महेश मंगवडे.या सर्व पुरस्कार व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button