Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून पिंपरी विधानसभा क्षेत्र ओळखले जाते. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा अनुशेष बाकी आहे, तो भरून काढण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष तरतूद करावी अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली आहे. शनिवारी (दि.१५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात आयुक्त सिंह यांच्या समवेत आमदार उमा खापरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी विधानसभा क्षेत्रातील भाजपाच्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक १९ मधील नाले विकसित करणे, प्रभाग क्रमांक १० सह पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सातही प्रभागांमधील मधील प्रलंबित कामे मार्गी लावणे, मेट्रोलगत पार्किंग साठी केलेले आरक्षण विकसित…

Read More

– पिंपरीत कायदा सुवस्था राखण्यात पोलिसांना अपयश आल्याचा करणार निषेध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील कायदा सुव्यस्था राखण्यात पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. गेल्या काही महिन्यात शहरात घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध होत आहे. शहरात थेरगाव येथील एका दलित कुटुंबावर अन्याय करणारी घटना समोर आली आहे. सावकारी जाचाला कंटाळून रिक्षा चालक आणि एका कुटुंबाने आत्महत्या केली. पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने या घटना घडत आहेत. या बाबत लवकर चौकशी करून न्याय न दिल्यास प्राणांतिक उपोषण करून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला. मंगळवार दि. 18 फेब्रुवारीपासून पिंपरी येथील डॉ.…

Read More

तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यात बंजारा समाज भवन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, बंजारा बांधवानी मावळ तालुक्यात जागा उपलब्ध करून द्यावी. आपण समाज भवन बांधण्यासाठी ५१ लाख रुपयांचा निधी देऊ, असे आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले. बंजारा सेवा संघ, मावळच्या वतीने संत गुरु सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील सुशीला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक ते सुशीला मंगल कार्यालया दरम्यान भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत मावळ तालुक्यातील बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भोग करण्यात आला. या मेळाव्याचे…

Read More

सासवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यस्तरीय सोळावे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन दि. १२ मार्च २०२५ रोजी सासवड (ता.पुरंदर) येथे होणार आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली. साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, ग्रथदिंडी, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीला राजाभाऊ जगताप, दत्तनाना भोंगळे, सुनिल लोणकर, शामराव मेमाणे, गंगाराम जाधव, सुनिल धिवार, दीपक पवार, संजय सोनवणे, दत्ता कड, प्रफुल्ल देशमुख, राजेश काकडे, अरविंद जगताप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ‘संघर्षयोद्धा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी ( दि.१६) आयोजित केला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंदगिरी महाराज आणि शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे यांनी दिली. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय सहकार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थितीती असणार आहे. आमदार महेश लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १३ फेब्रुवारी या जागतिक रेडिओ दिनानिमित्त साधून ‘पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ च्या वतीने निगडी, प्राधिकरण येथील वीर सावरकर उद्यानात ‘आदिम’ प्रस्तुत व्यंकटेश माडगूळकर लिखित ‘नागझिरा’ या निसर्गवर्णनाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी देवराई फाऊंडेशनचे संस्थापक आणि पीसीएमसी स्मार्ट सिटी कमिटीचे सदस्य धनंजय शेडबळे, पीसीईटी च्या मीडिया अँड ब्रँडिंग विभागाचे प्रमुख डॉ. केतन देसले, प्रा. आनंद बिराजदार, डेक्कन कॉलेजच्या प्रा. डॉ. प्रज्ञा कुलकर्णी आदी उपस्थित होते. ‘रेडिओ आणि हवामान बदल’ ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती. सामान्य माणसाच्या मनात निसर्गाबद्दल आपलेपणाची भावना आणि जबाबदारीची जाणिव निर्माण व्हावी या उद्देशाने भंडारा जिल्ह्यातल्या नागझिरा जंगलात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहराच्या सौदर्य व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर असते. त्यासाठी महापालिका वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून आता शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा, राडा-रोडा, प्लास्टिक, शहरात आरएमसी प्लॉटमधून होणारे हवेचे प्रदूषण, बांधकामाच्या ठिकाणी होणारा कर्कश आवाज, शहरात होणारे ध्वनी प्रदूषण, घर बांधकाम करतांना घराच्या बाहेर टाकला जाणारा राडारोडा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिका २४x७ करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने मे शुभम उद्योग प्रा. लि. व मे. सैनिक इंटलिजन्स अँड सिक्युरिटी प्रा. लि. या संस्थेची स्वतंत्रपणे नेमणूक केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात पर्यावरणाची हानी करणाऱ्या कंपन्या किंवा समाजकंटकांवर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली – कुदळवाडी येथे सलग सातव्या दिवशी १९२ एकर जागेत  असलेल्या ६३३  अनधिकृत पत्राशेड बांधकामांवरनिष्कासन कारवाई करण्यात आली.  याठिकाणी असलेलेअनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे याकारवाईमध्ये निष्कासित करण्यात आले. नियोजितविकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी  पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनयांच्या संयुक्त मोहिमेतून चिखली – कुदळवाडी येथे निष्कासनाची कारवाई करण्यात येतआहे.  याठिकाणी आज ८३ लाख ९७ हजार २४९ चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले. यामध्ये एकूण ६३३ बांधकामाचा समावेश होता. पोलीसआयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई हाती घेण्यात आली. या कारवाई वेळी अतिरिक्तआयुक्त प्रदीप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी सत्तारुढ पक्षणेते एकनाथ पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. संघटन पर्व – विभागीय कार्यशाळा दौऱ्या निमित्त पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठकी दरम्यान, शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या आदेशाने हा प्रवेश करण्यात आला.

Read More

आदिवासींना मिळाले जातीचे दाखले, घरकुल योजनेचे अर्ज, शिधापत्रिकेचे अर्ज आणि आभा कार्डची सुविधा पवनानगर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या संकल्पनेतून आदिवासी ठाकर-कातकरी समाजासाठी विशेष सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये घरकुल योजना, जातीचे दाखले, तसेच शिधापत्रिका काढण्याच्या प्रक्रियेसाठी नागरिकांना सहकार्य करण्यात आले. या अभियानाद्वारे शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. सेवा अभियान १२ आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी महादेव मंदिर, गावठाण, शिळींब येथे आयोजित करण्यात आले होते. या अभियानाद्वारे तिकोणा, जवन नं.१, २, ३, आजिवली, वाघेश्वर, कादव, शिळींब, बोडशिळ, डोंगरवाडी (कोटमवाडी), चावसर, मोरवे, तुंग आणि कोळे चाफेसर या गावांतील नागरिकांना आवश्यक सेवा…

Read More