ताज्या घडामोडीपिंपरी

चिखली- कुदळवाडी भागात अतिक्रमणकारवाईमध्ये  सातव्या दिवशी ६३३ पत्राशेड बांधकामे निष्कासित

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली – कुदळवाडी येथे सलग सातव्या दिवशी १९२ एकर जागेत  असलेल्या ६३३  अनधिकृत पत्राशेड बांधकामांवरनिष्कासन कारवाई करण्यात आली.  याठिकाणी असलेलेअनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे याकारवाईमध्ये निष्कासित करण्यात आले. नियोजितविकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी  पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनयांच्या संयुक्त मोहिमेतून चिखली – कुदळवाडी येथे निष्कासनाची कारवाई करण्यात येतआहे.  याठिकाणी आज ८३ लाख ९७ हजार २४९ चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले. यामध्ये एकूण ६३३ बांधकामाचा समावेश होता.

पोलीसआयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई हाती घेण्यात आली. या कारवाई वेळी अतिरिक्तआयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर,   राजेश आगळे, सीताराम बहुरे, क्षेत्रीयअधिकारी अजिंक्य येळे, शीतल वाकडे, अमितपंडित, सुचिता पानसरे, किशोर ननवरे,श्रीकांत कोळप, महेश वाघमोडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठअभियंता सहभागी झाले होते. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्तस्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापूबांगर, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या निष्कासनाच्या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारीअभियंते,१६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८०जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. तर ४४  पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर करण्यात आला. ३ अग्निशमन वाहने आणि २रुग्णवाहिका देखील याठिकाणी  तैनात करण्यातआल्या होत्या. महापालिका आणि पोलीस यंत्रणेसह वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारीदेखील या कारवाईमध्ये  सहभागी झाले होते.                                                                                                 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button