प्राणांतिक उपोषण करून आत्मक्लेश आंदोलन – दलित अत्याचार, सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या प्रकरणी बाबा कांबळे यांचा इशारा
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/02/images30.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250126-WA0879.jpg)
– पिंपरीत कायदा सुवस्था राखण्यात पोलिसांना अपयश आल्याचा करणार निषेध
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250126-WA1744.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250126-WA0879.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-10-at-11.28.44-AM.jpeg)
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील कायदा सुव्यस्था राखण्यात पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. गेल्या काही महिन्यात शहरात घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध होत आहे. शहरात थेरगाव येथील एका दलित कुटुंबावर अन्याय करणारी घटना समोर आली आहे. सावकारी जाचाला कंटाळून रिक्षा चालक आणि एका कुटुंबाने आत्महत्या केली. पोलीस प्रशासनाचा धाक नसल्याने या घटना घडत आहेत. या बाबत लवकर चौकशी करून न्याय न दिल्यास प्राणांतिक उपोषण करून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचा इशारा कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला. मंगळवार दि. 18 फेब्रुवारीपासून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या आंदोलनाला सुरुवात होईल असेही बाबा कांबळे म्हणाले.
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250126-WA16271.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी हा इशारा दिला आहे.
बाबा कांबळे सोशल मीडियावर आवाहन करताना म्हणाले की, थेरगाव येथील कुटुंब न्याय मागण्यासाठी मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निघाले आहे. त्यांना काही लोकांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. कुटुंबाला मिळणारे पाणी बंद करण्यात आले आहे. याची पिंपरी चिंचवड पोलीस आणि महापालिकेने दखल घेतली नाही. पुरोगामी महाराष्ट्रात जातीय अन्याय अत्याचार थांबताना दिसत नाही. पोलीस प्रशासन यामध्ये सपशेल अपयशी ठरले आहे. केवळ हे एकच प्रकरण नाही. तर नुकतेच पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकाने सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या पुर्वीही एका कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खासगी सावकारीविरोधात कडक कायदा आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे कुटुंब उघड्यावर पडत आहे. पोलिस प्रशासन देखील या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. त्यामुळेच राजू राजभर या रिक्षा चालकाने आत्महत्या करूनही त्याचे आरोपी मोकाट आहेत. अनेकदा शहरात एकाच दिवशी सात आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.
या सर्वांना न्याय मिळवून देणे अपेक्षित असताना त्यांच्याकडे शासन यंत्रणा दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी करून अन्याय करणाऱ्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे. अन्यथा वरील सर्व घटनांच्या न्याय हक्कासाठी आणि चुकीच्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सत्याग्रह सुरू करून आत्मक्वेष आंदोलन करणार असे बाबा कांबळे म्हणाले. पिंपरी चिंचवड शहरात गेली काही दिवसापासून; कायदा सुव्यवस्था खालवली असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात सर्व सामान्य नागरिक सर्वसामान्य जनता यांना न्याय मिळत नाही. पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार करून, निवेदन देऊन, कोणतीही दखल घेतली जात नाही. या वर सुधारणा न झाल्यास मंगळवार पासून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
बाबा कांबळे यांच्या मागण्या –
१) थेरगाव येथील दलित कुटुंब यांना पिण्याचे पाणी बंद केले. शौचालय तोडले. जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी कुटुंबाची तक्रार दाखल करून घेतली नाही. न्याय मिळण्यासाठी ते कुटुंब पुणे ते मुंबई पायी चालत मुंबईला निघाले आहे. ही घटना अत्यंत विदारक असून या प्रकरणी चौकशी करून त्या कुटुंबास न्याय मिळावा.
२) आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत वय 80 वर्ष ज्येष्ठ नागरिक दलित महिलेस, धर्म शाळेत डांबून ठेवले, लाईट शौचालय बंद केले, गोळ्या व औषधे पासून वंचित ठेवले व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे राहते घर पाडले या प्रकरणी वारंवार तक्रार करून, गुन्हा दाखल केला नाही, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा.
३) सावकारच्या जाचाला कंटाळून चिंचवड येथील रिक्षा चालकांनी तसेच चिखली येथील सर्व कुटुंबाने आत्महत्या केली वारंवार अशा घटना घडत आहेत. पोलीस तक्रार घेत नाहीत. त्यामुळे असे प्रकरण घडत आहे, याबाबत सक्षम यंत्रणा तयार करावी.
४) श्री क्षेत्र आळंदी देवाची या संत भूमीत वारकरी सांप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवइन विद्यार्थींनीवर लैंगिक अत्याचाराची घटना पाहता आळंदी येथे सक्षम यंत्रणा उभारावी.
५) पवित्र इंद्रायणी नदीत, ड्रेनेजचे घाण पाणी, रसायन तसेच हातभट्टीचे रसायन युक्त पाणी सोडले जाते. यामुळे इंद्रायणी व संत भूमी अपवित्र झाली आहे. याप्रकरणी तक्रार देऊन देखील कारवाई करण्यात आली नाही. याप्रकरणी योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
६) आळंदी येथील संत रोहिदास घाटावर घाण रसायन सोडले जात आहे. याबाबत योग्य उपयोजना करणे व या ठिकाणी संत रोहिदास यांची मूर्ती बसवून सुशोभीकरण करणे.
७) बहुजन समाज पक्ष नेते स्वर्गीय कांशीराम यांच्यासोबत आत्तापर्यंत काम करणारे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, बळीराम काकडे यांच्यावर जातीय भावनेतून अन्याय झाला. पिंपरी चिंचवड महापालिका फेरीवाला समितीच्या निवडणूक मध्ये विजय झालेले असताना, त्यांना पराभूत ठरविण्यात आले. या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन देखील कार्यवाही करण्यात आली नाही.
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241204-WA1329.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0157.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250107-WA2286.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250109-WA0265.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250109-WA1543.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250124-WA3944-scaled.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250126-WA0263.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250131-WA1568.jpg)
![](https://maharashtrabreakingnews.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250213-WA1721.jpg)