- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे यावर्षीही पिंपरी न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटात साजरा करण्यात आली. आज बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतिराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी महात्मा फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला…
पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवाजी महाराजांच प्रशासन प्रगतीशील धोरणे आणि कार्यक्षम वैशिष्ट्यीकृत होतं. किनारपट्टीच्या रक्षणासाठी नौदलाच्या वर्चस्वाचे महत्त्व ओळखून त्यांनी एक मजबूत नौदल दल स्थापन केले. त्यांच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये शिस्तबद्ध लष्करी रचना निर्माण करणे, महसूल सुधारणांचा परिचय आणि व्यापाराला चालना देणे यांचा समावेश होता. त्यांनी धार्मिक सहिष्णुतेवरही भर दिला आणि विविध समाजाचे समर्थन केले, ज्यामुळे त्यांच्या सर्व प्रजेला न्याय मिळाला. त्यांनी गनिमी युद्धाच्या युक्त्यांचा वापर करून अनेक किल्ले आणि प्रदेश सामरिकदृष्ट्या ताब्यात घेतले आणि ते त्यांचे ते ट्रेडमार्क बनले. जिजाबाईंनी त्यांच्यात लहानपणापासूनच मातृभूमी आणि लोकांबद्दल अभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण केली होती. त्यामुळेच ते आज रयतेचे लोकप्रिय राजे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राजनीतिज्ञ, युध्दनितीनिपुण तर होतेच शिवाय ते सर्वांना समान वागणूक व न्याय देणारे जगातील आदर्श राजे होते,त्यांच्या महान कार्याचा, युध्दकौशल्याचा अभ्यास जगभरातील इतिहासाचे तज्ञ व अभ्यासक करतात याचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. निगडी येथील भक्ती शक्ती चौक उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाची सुरूवात करण्यात आली, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतताना आयुक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मराठी मनामनात शिवराय वसले आहेत. मात्र काही हितशत्रू शिवरायांच्या चरित्राशी हेळसांड करण्याचा प्रयत्न करून समाज मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या तरुणांचे श्रद्धास्थान शिवाजी महाराज असले तरी त्यांचे चरित्र अवगत नाही त्यामुळे काही समाजद्रोही सामाजिक द्वेष निर्माण करू पाहतात. याचसाठी चित्रपट अभिनेत्री आर्या घारे हिने आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे आज शिवजयंती साजरी केली. नाचून नव्हे शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरे करूया असा संकल्प करून तिने आपल्या मैत्रिणींसह पिंपरी मोरवाडी चौक येथे शिवचरित्राचे वाटप करून ही शिवजयंती साजरी केली. मोरवाडी चौकात जवळपास 3000 पुस्तकांचे तिने वाहन चालकांना…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने काकडे पार्क चिंचवड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले.फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी छत्रपती शिवराय यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले व वूई टुगेदर फाउंडेशन विषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली. वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी शिवजयंतीला वेगळा उपक्रम घेतला जातो या वर्षी गडकिल्ले संवर्धन,इतिहास जपणारे,व श्यक्य तेवढा शिवराय,संभाजी राजे, यांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणारे,तसेच जेष्ठ नागरिक यांचा शाल,श्रीफळ,फुले देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी वूई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सामूहिक शिव वंदना व घोषणा देण्यात आल्या.…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने एमआयडीसी भोसरीतील कॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर मध्ये औद्योगिक कायझेन स्पर्धा 2025 घेण्यात आली. या स्पर्धेत 72 कंपन्या मधून 735 स्पर्धकांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी ,पोस्टर, घोषवाक्य यात स्पर्धकांनी सहभाग नोंदवीत विविध संघाने त्यांच्या कंपन्यात केलेल्या सुधारणा सादर केल्या. सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून उद्योग व शिक्षण क्षेत्र यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी संगमनेर येथील अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील 60 विद्यार्थी या स्पर्धेला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील तज्ञांशी संवाद यावेळी साधला. कार्यक्रमाचे उद्घाटन क्लोराईड मेटल्स लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर व प्लांट हेड राजलक्ष्मण आर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ढोल – ताशाच्या गजरात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रशालेत वर्षभर घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आरती राव व प्रणव राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – फॉर्मुला भारत ही भारतातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक वाहन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये संघटन, नियोजन, अभियांत्रिकी कौशल्य आणि सातत्यपूर्ण अचूक प्रदर्शन करीत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. नवसंशोधन, उत्कृष्ट तांत्रिक क्षमता आणि अपार जिद्द, नियोजन यामुळे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) टीम क्रेटॉसने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासाठी त्यांना प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पीसीईटीच्या विश्वस्तांचे पाठबळ मिळाले आहे यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करताना विश्वस्त मंडळाला अभिमान वाटतो असे गौरवोउद्गार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी काढले. कोईमतूर येथे झालेल्या फॉर्मुला भारत २०२५ या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या, आकुर्डी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात काळानुरूप अनेक बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर मुक्तहस्ते केला जात आहे. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्थापत्य अभियांत्रिकीतील मूलभूत संकल्पनांचे सखोल आकलन करत व्यावसायिक प्रवासाला आकार दिला पाहिजे, असे मार्गदर्शन पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चच्या (पीसीसीओईआर) वतीने शासकीय प्रकल्प, त्यातील संधी, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष साइटवरील अनुभव यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी मिलेनियम इंजिनीअर्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.चे सहाय्यक व्यवस्थापक (प्लानिंग) मयुर…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी या प्रकल्पाअंतर्गत या ठिकाणच्या १५०० झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. उर्वरित १३०० झोपड्या अद्यापही त्याच ठिकाणी आहेत. या झोपडीधारकांना मागील एक वर्षापासून प्राथमिक सेवा, सुविधा देखील देण्यात आलेल्या नाहीत. याविषयी येथे राहणाऱ्या नागरिकांनी एसआरए कार्यालयात तक्रार केली असता रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता, मलनिसारण वाहिनी या सुविधा देण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. परंतु महानगरपालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी अध्यापही १५०० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. त्यांना रस्त्यावरून झोपडपट्टीत जाण्यासाठी डांबरी रस्ता उपलब्ध नाही, ड्रेनेजची…
