- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे अभिमानास्पद असून मराठीचा वापर- व्यवहार सर्व स्तरांत व सर्वदूर वाढला पाहिजे. प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतले तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आज येथे केले. नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे. या अनुषंगाने प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी गुरुवार (२० फेब्रुवारी) रोजी महानगरपालिकेच्या विविध विभागांना भेट देत तेथील विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांची सज्जता आणि सर्व कार्यालयांची सर्वंकष स्वच्छता मोहीम यावर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. याप्रसंगी भांडार विभागाचे उप आयुक्त निलेश भदाणे, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखळे, स्थापत्य विभागाचे अभियंता बाळासाहेब शेटे, माहिती व तंत्रज्ञान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्य संग्रामच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवनेरी किल्ला स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेचे हे नवे वर्ष होते दरवर्षी 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारीला किल्ला स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाते. यात शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात सकाळी लवकर सुरू झालेली ही मोहीम दुपारपर्यंत किल्ला स्वच्छ करून सर्व कचरा घेऊन शिवप्रेमी खाली उतरतात. अलीकडे “छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या बद्दल काहीजण अवास्तव वक्तव्य करून समाजात अशांतता पसरवण्याचे काम करत आहेत त्यांना आवरण्यासाठी सर्व आमदार खासदारांनी संसदेत आवाज उठवून त्यावर कायदा अमलात आणावा अशी मागणी यावेळी महेश लाड यांनी केली.” या मोहिमेत…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण १३३७ शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरीमध्ये १२ फेबुवारीला १०१५ लाभार्थी पात्र झाले आहेत. पात्र लाभार्थ्यांनी १७ ते २५ फेबुवारीपर्यंत सदनिका स्वीकारणे अथवा समर्पित करणेबाबत संबंधितांच्या लॉगिनला पत्र पाठविण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांनी सदनिका स्वीकारल्यानंतर त्यांना तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार येणार आहे. त्यामध्ये प्रथम टप्प्यातील २५% रक्कमेचा भरणा करण्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून ४५ दिवसानंतर) SBI च्या MCLR दराप्रमाणे व्याज आकारणीच्या अधिनराहून १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल. या कालावधीतही (तात्पुरत्या देकारपत्राच्या दिनांकापासून ६० दिवसांत) प्रथम टप्प्यातील २५% रक्कम न भरल्यास सदनिकेचे वितरण कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल. टप्पा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. साहित्य आणि साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान हे प्रवासी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज (दि.१९) मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्सची ऑनलाईन राष्ट्रीय परिषद तज्ञ प्राध्यापक व संशोधकांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्स मधील भविष्यातील आव्हाने, संधी, वेगाने विकसित होणारे संशोधन याविषयी सहभागी संशोधकांनी आपले मत व्यक्त केले. यामध्ये प्राध्यापक, संशोधक, शैक्षणिक तज्ञ आणि उद्योगक, व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय परिषदेचे आयईटीई पुणे केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुनील सोमाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आयईटीई मुंबई विभागाचे डॉ. शशिकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्स या विषयांवर आधारित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयू) ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबरच महान मराठा योद्धांना अभिवादन करण्यात आले. या प्रदर्शनात शिवाजी महाराजांचे दूरदर्शी नेतृत्व, सैन्यनीती आणि प्रेरणादायी वारसा यांचा उलगडा करणाऱ्या ऐतिहासिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यां आणि प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन ग्रंथ संपदेचा लाभ घेतला. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पीसीयूच्या उपकुलगुरु डॉ. मणिमाला पुरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी उपकुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. मणिमाला पुरी यांनी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सक्षमा प्रकल्पाअंतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेल्या बॅग, फोल्डर, डायऱ्या आणि बुकमार्क्स या वस्तूंचे येत्या २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पश्चिम विभागीय परिषदेमध्ये वितरण केले जाणार आहे. यामुळे महिलांच्या उद्योजकतेला नवीन व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षमा प्रकल्प राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत ५,००० महिला बचत गटांना कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सध्या २,५५६ बचत गट या प्रशिक्षणाचा लाभ घेत असून महिलांना स्वयंरोजगार निर्माण करून देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर सचिव पदी मंगेश सोनटक्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी गणेश हुंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची आज (शुक्रवारी) बैठक खेळीमेळीत पार पडली. यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियुक्ती प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी संघटनेचे प्रदेश सचिव महेश कुंगावकर, सरपंच परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब जगदाळे, राज्य समन्वयक अमोल पाटील, राज्य सहसचिव केतन महामुनी, माजी पुणे जिल्हाध्यक्ष अजिंक्य स्वामी, माजी शहराध्यक्ष विकास शिंदे…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज , प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कमला एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज, डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या शिवभक्त विद्यार्थ्यांनी किल्ले शिवनेरी येथून शिवज्योत धावत आणण्यात आली .शिवज्योती चे चिंचवड येथे आगमन होताच…
