तरुणात निर्माण क्षमता असल्याशिवाय राष्ट्र पुढे जाणार नाही – डॉ. प्रमोद बोराडे


चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज , प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.



कमला एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. वाळुंज, डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या शिवभक्त विद्यार्थ्यांनी किल्ले शिवनेरी येथून शिवज्योत धावत आणण्यात आली .शिवज्योती चे चिंचवड येथे आगमन होताच भगवे झेंडे हातात घेत , ढोल ताशाच्या गजरात ,फटाक्याच्या आतिषबाजीत जय भवानी, जय शिवाजीचा जयघोषात एकच जल्लोष करीत सारा परिसर दुमदुमून गेला . शिवभक्त विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करीत महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवज्योतीचे मोठ्या थाटामाटात शिवभक्ताचे स्वागत करून त्याचे औक्षण करण्यात आले. यावेळी प्राध्यापक वृंद , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती निमित्ताने विद्यार्थासाठी इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे याच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .
भव्य व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी शिवज्योत ठेवण्यात आली.आरती करून शिवरायाना उपस्थितांच्या वतीने मानवंदना दिली व जोरदार धोषाणा दिल्या . या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने इतिहास संशोधक व अभ्यासू वक्ते डॉ . प्रमोद बोराडे , तळेगाव दाभाडे येथील पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सदस्य निलेश गरुड, बबनराव गायकवाड आदींचा एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी याच्या हस्ते स्मृतीचिन्ह, श्रीफळ व भेटवस्तू देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर यावेळी प्रा. गुरू राज डांगरे , प्रा. मनीष पाटणकर , डॉ . सुवर्णा गायकवाड उपस्थित होते .
शिवचरित्र व शिवरायांच्या गौरवशाली इतिहास मांडताना इतिहास संशोधक व प्रसिद्ध वक्ते डॉ. प्रमोद बोराडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण व विचार अनन्य साधारण असेच होते. ते हिंदू धर्माचे अभिमानी होते. त्यांच्या अभिमान हा इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. त्यांनी संघर्षातून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. जगभरात 196 देशांमध्ये सर्वात मोठी जयंती शिवरायांची साजरी होते. इतर राजेही होऊन गेले. शिवरायांनी नवीन पिढीला राष्ट्रवाद दिला.संस्कार दिले त्यांचे संस्कार युवकांनी आचारनात व वर्तनात आणले पाहिजे. संस्कारानेच नवीन पिढी घडते. युवकांनी संस्कार इतिहासापूर्ती मर्यादित ठेवता कामा नये .स्वराज्याचे सुराज्य करण्याचा ध्यास युवकांनी अंगीकारावा. लक्षात ठेवा कोणतेही स्वातंत्र्य मिळत नसते, ते निर्माण करावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र धर्म समजला. तसाच तो जगदगुरु संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामींना कळल , त्यांनी महाराष्ट्र धर्म जागृत केला, प्रसार केला . शिवरायांनी 18 कंपन्यांची निर्मिती केली. रयतेतील हाताना रोजगार, उत्पन्न मिळवून दिले . स्वतःची शास्त्रे स्वतःच केली .तलवारीत बदल घडवून आणला .आजच्या युवकांनी फक्त जय भवानी ,जय शिवाजी बोलून चालणार नाही. फक्त ढोल ताशे वाजूनही चालणार नाही. शिवजयंती ही प्रबोधनात्मक साजरी केली गेली पाहिजे. भविष्यात तुम्हाला काय करायचे ते करा. तुमच्या मनगटात क्षमता असल्याशिवाय राष्ट्रही पुढे जाणार नाही . यासाठी तुमच्या हृदयातील भयापासून मुक्त व्हा, त्यापासून दूर राहा .परीक्षा, मुलाखत याला घाबरू नका. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. शिवचरित्र वाचा ,त्यापासून प्रेरणा घ्या असे आवाहन करून शिवराया स्वतः निर्व्यसनी होते .असे त्यावेळी त्याचे शत्रूच बोलत होते. आजच्या युवकांनी त्यांच्या एक सद्गुण घ्यावा. स्वतःच्या मनाला फसवू नका. आपले चरित्र्य शुद्ध ठेवा. तुमचे तुम्हीच या शैक्षणिक प्रांगणात शपथ घ्या , स्त्रिया, लहान मुले, वृद्धांचा सन्मान करा. यावेळी अनेक इतिहासाचे दाखले डॉ . बोराडे यांनी देत प्रतिभा इन्स्टिट्यूटने विद्यार्थी मध्ये चांगली संस्कृती रुजविली याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे, भाषणे, नृत्य ,गीत , शिवकालीन मर्दानी खेळ आदी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आशिष कपले ‘ तसेच वैष्णवी फाळके यांनी केले.









