- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदूस्थानवर क्रुरपणे अमानुष अत्याचार करणारा मुघल सम्राट औरंगजेबने माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर इस्लाम स्वीकारण्यासाठी भिक मागितली होती. त्या औरंग्याचे उदात्तीकरण काय करतो? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबु आझमी सारख्या प्रवृत्तींना सभागृहातच आणि रस्त्यावर ठेचून काढले पाहिजे, असा संताप भाजपाचे प्रखर हिंदूत्त्ववादी नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी भर सभागृहात व्यक्त केला. महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे क्रूरकर्मा औरंगजेब धार्जिने आमदार अबू आझमी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत. याच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर भारतीय जनता पार्टी महायुतीच्या समविचार आमदारांनी आज आंदोलन केले. या आंदोलनामध्ये ‘‘हाल हाल करुन मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला…
मराठीसह संत साहित्य अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून जगभरात पोहोचवणार ; उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांचे हस्ते प्रकाशन संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सवी वर्ष उपक्रम आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर माऊली, श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेवराय, संत बहिणाबाई आदी संतांचे साहित्य हे मराठी भाषेचे वैभव असून मराठी भाषा अभिजात भाषा आहे. या पुढील काळात जगभर जाण्यासाठी मराठीसह संत साहित्य ई बुक, डिजिटल स्वरूपात विकसित करण्याचा संकल्प असून येत्या पाच वर्षात संत तुकाराम महाराज यांची गाथा ही ई बुक मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केसबी दसरा चौक येथील शाहूसृष्टी येथे तात्काळ उपाय योजना करा अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, (दसरा) चौक येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज सृष्टी तसेच माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्व. आण्णासाहेब पाटील यांचा अर्धाकृती पुतळा अशा अनेक शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या गोष्टी आहेत. सध्याची स्थिती पाहता शाहू सृष्टीचे अंतिम टप्प्यातील काम सुरु असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या संपूर्ण परिसरात सध्या विद्युत रोषणाईचा आभाव असून त्यामुळे हा परिसर मद्यपींचा अड्डा बनू लागला आहे. भविष्यात एखादा गैरप्रकार येथे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज पुणे आयोजीत पुणे उपवर ओळख परिचय संमेलन- २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड येथे प्रथमच उप वर (मुल) पाहण्यासाठी उप वधू (मुली) सर्व विवाह उत्सुक मुलांना एकाच वेळी, एकाच मंचावर उप-वधू व तिच्या पालकांना बघता आले. सदर मेळावा वाणी समाजातील इतिहासातील पहिल्यांदाच उपवर व उपवधू यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर प्रसंगी आपल्या मुलीसाठी सुयोग्य वर निवडण्यासाठी मदत झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे व या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक युवा नेतृत्व तथा लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे…
लोकशाहीदिनातून नागरिकांच्या समस्याचे निराकारण होणार का? पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करणे तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढवून लोकाभिमुख, गतिमान प्रशासन निर्माण करण्याच्या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज पार पडलेल्या लोकशाही दिन उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याबाबत विविध सूचना केल्या. यावेळी उपआयुक्त तथा लोकशाही दिन उपक्रम समन्वय अधिकारी राजेश आगळे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, प्रशासन अधिकारी श्रद्धा…
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -वाढती लोकसंख्या आणि भविष्यकाळात पाण्याची मागणी लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाला मंजुरी देण्याबाबत महायुती सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार लांडगे यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवडचा पाणी पुरवठा आणि नवीन जलस्त्रोत निर्मिती याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाहतूक कोंडीतून पुणेकरांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि.३) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम व निर्मुलन विभागासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने २०१ अतिक्रमणे काढण्यात आली. या अतिक्रमण निष्कासन मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तीन प्रमुख मार्गावर सकाळपासून कारवाईचा धडाका सुरु होता. त्यामुळे दिवसभरात एकूण २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक विविध भागातील अतिक्रमणावर हातोडा पडला. पुणे शहराभोवती असणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यमार्गावर होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी संबंधित भागात आगामी ३० दिवसात रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले अनधिकृत व अतिक्रमित दुकाने, गाळे, बांधकामे आदींवर लक्ष्य करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पीएमआरडीए, पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक पोलीस विभाग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण शिल्लक असलेल्या २२ गाळे आणि ४ रो हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक नागरिकांकडून ३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते २४ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. प्राधिकरणाच्या पेठ क्र. ३०, Convenience Shopping Centre मधील उर्वरीत ५ व्यापारी दुकाने ज्यांची किंमत १२,६५,२९२/- ते १९,८१,६७१/- या दरम्यान असून पेठ क्र. १२ मधील गृहयोजना क्र. १ व २ मधील उर्वरीत १६ व्यापारी दुकाने ज्यांची किंमत ९,४८,१२३/- ते २०,७७,०३७/- आहे. पेठ क्र. ४ मधील दुकान क्र. ६ मधील १ दुकानाची किम्मत ४३,८२,३५१/- इतकी असून सदर…
लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर होणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत टपऱ्यांच्या अतिक्रमणाबाबत आणि त्यावर होणाऱ्या कारवाईसंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. शहरातील टपऱ्यांविषयी नागरिकांच्या तक्रारी निवडणुकीपूर्वीच समोर आल्या होत्या. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये आयोजित जनसंवाद दौऱ्यादरम्यानही वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. त्यानुसार, नगरपरिषदेने अशा अनधिकृत टपऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. दहापेक्षा अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या टपऱ्यांना संरक्षण बैठकीत ठरवण्यात आले की, नगरपरिषदेच्या जागेतील १० ते १५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आणि टपरी संघटना व नगरपरिषदेकडे अधिकृत नोंद असलेल्या टपऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार…
शहरातील विविध सामाजिक संघटना, समाजसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त सहभाग पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात (रविवारी) सकाळी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सुमारे 42 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यामध्ये 13 टन ओला कचरा आणि 29 टन सुका कचरा संकलित करण्यात आला. तसेच शहरातील एकूण 43 कि.मी. लांबीचा दुतर्फा रस्त्याची स्वच्छता या अभियानात करण्यात आली. भारताचे स्वच्छतादूत महाराष्ट्र भूषण तथा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महास्वच्छता अभियान आज संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड…
