ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या महास्वच्छता अभियानांतर्गत 42 टन कचऱ्याचे संकलन

प्रतिष्ठानचे सुमारे 2500 श्रीसदस्य मोहिमेत सहभागी

Spread the love

शहरातील विविध सामाजिक संघटना, समाजसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात (रविवारी) सकाळी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सुमारे 42 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यामध्ये 13 टन ओला कचरा आणि 29 टन सुका कचरा संकलित करण्यात आला. तसेच शहरातील एकूण 43 कि.मी. लांबीचा दुतर्फा रस्त्याची स्वच्छता या अभियानात करण्यात आली.

भारताचे स्वच्छतादूत महाराष्ट्र भूषण तथा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महास्वच्छता अभियान आज संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, निगडी, थेरगाव, पिंपरी परिसरात हे अभियान संपन्न झाले.

या मोहिमेत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे दोन हजारांहून अधिक श्रीसदस्यांनी सहभाग नोंदवला. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्तपणे अभियानात सहभाग घेतला.

सदर महास्वच्छता अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील भक्ती शक्ती चौक परिसर, दुर्गा टेकडी परिसर, म्हाळसकांत चौक परिसर, त्रिवेणी चौक परिसर, थरमॅक्स चौक परिसर, बर्ड व्हॅली गार्डन परिसर, साने चौक परिसरातील भाजी मंडई परिसर, थेरगाव येथील डी-मार्ट परिसर, धनगर बाबा मंदिर परिसर, काळेवाडी फाटा ते डांगे चौक परिसर, तापकीर चौक परिसर, बारणे कॉर्नर परिसर, पिंपरीतील भाट नगर येथील स्मशानभूमी परिसर, वाल्हेकरवाडी चौक परिसर, मोरया गोसावी मंदिर परिसर आणि चिंचवड भाजी मंडई परिसर या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत सहभागी झालेले मान्यवर आणि विविध संघटना

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवर आणि संघटनांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव खटके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हेमंत डांगे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा बागल, पोलीस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, पिंपरी न्यायालयाचे सरकारी वकील ऍड. संजय राठोड, खान्देश युवा महासंघचे अध्यक्ष माऊली जगताप, पिंपरी चिंचवड व्यापारी संघटना, चंद्ररंग असोसिएट, सह्याद्री अकॅडमीचे सोपान पाटील, द्रोणाचार्य अकॅडमीचे उमेश बोरसे, एज्युनिव्ह इन्स्टिट्यूटचे संचालक नितीन माने, एच.आर.डी. सेंटरचे वीरेंद्र सेंगर, व्यसनमुक्ती महासंघचे श्री. पतंगे, ज्येष्ठ नागरिक महासंघचे अध्यक्ष विकास ढोले, स्किलअप सॉफ्टवेअर अँड आयटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सचिन पवार यांच्यासह अनेक सामाजिक संघटना आणि संस्थांचे पदाधिकारी या अभियानात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button