लाडशाखीय वाणी समाजाचे उपवर ओळख परिचय संमेलन संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाज पुणे आयोजीत पुणे उपवर ओळख परिचय संमेलन- २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.


पिंपरी चिंचवड येथे प्रथमच उप वर (मुल) पाहण्यासाठी उप वधू (मुली) सर्व विवाह उत्सुक मुलांना एकाच वेळी, एकाच मंचावर उप-वधू व तिच्या पालकांना बघता आले. सदर मेळावा वाणी समाजातील इतिहासातील पहिल्यांदाच उपवर व उपवधू यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर प्रसंगी आपल्या मुलीसाठी सुयोग्य वर निवडण्यासाठी मदत झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पिंपरी चिंचवड भाजप जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे व या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक युवा नेतृत्व तथा लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज ब्राह्मणकर ,परिचय मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र महालपुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी कार्याध्यक्ष दगडू पाटील, उपाध्यक्ष नितीन देव , नितीन वाणी सचिव किशोर ब्राह्मणकर , संघटन प्रमुख मनीषजी शिरुडे , सोपान पितृभक्त , संजय भामरे , योगेश चिंचोले स्वप्नील कोतकर , दिलीप कोठावदे , सुरेश वाणी , आनंद येवले, राजेंद्र सारंगे , अतुल अशोक फूलदेवरे , दिनकर तरवटे आणि जयेश देव , चंद्रकांत बहाळकर,रवींद्र येवले, पवन बहाळकर, प्रदीप शेंडे, प्रमोद शिरोडे, अमोल मराठे,दिनेश पाटे , गोकुळ सोनजे , तुषार कोठावदे, मिलिंद नानकर व या मेळाव्यासाठी विशेष अर्थिक सहकार्य योगेश मोराणकर, नितीन देव,मिलिंद वाणी व सदर कार्यक्रमास समाजातील इतरही समाज बांधवांचे आर्थिक सहकार्य लाभले.

शहराचे भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की वधू-वर परिचय मेळावे हे काळाची गरज आहे , या माध्यमातून वेळ आणि पैशांची बचत होवुन विवाह निश्चितचे काम होते . पिंपरी चिंचवड शहरांत परीचय मेळाव्यांचे आयोजन करणे सोपे काम नाही. तथापि , वाणी समाज मंडळांकडुन सातत्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याची बाब अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक मनोजजी ब्राम्हणकार यांनी समाजातील वाढते घटस्फोट , कुटूंबामध्ये आईचा हस्तक्षेप, मध्यस्थींची भुमिका , मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षा व दुरावत चाललेली समाज संस्कृती यावर आपले प्रखर मत व्यक्त केले.
या उप वर आणि उप वधू मेळाव्यात ३२७ उपवर व ३०९ उपवधू उपस्थितांसह संपुर्ण महाराष्ट्रातून पाल्य मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील सर्व सामाजिक संस्था व पदाधिकारी यांनी हातभार लावला तर उपस्थित पालकांना , समाजबांधवांना व उपवर , उपवधु यांना वाणी समाज धर्मदाय शैक्षणिक मंडळ ( पंढरपूर ) सचिव विलास तात्या शिरोरे नाशिक येथील शैक्षणिक संकुलपासुन होणारे फायदे व विद्यार्थ्यांचे भवितव्य बाबत सखोल मार्गदर्शन केले तर ह.भ.प.प्रा.उदयजी पाटकर, रेखा कोतकर , दिलीप आबा पाटकर यांनी संबोधित करत शुभेच्छा दिल्या तर संजयजी भामरे व प्रा.विजयजी बागडे यांनी सुत्रसंचलन केले व मनिषजी शिरुडे ,अतुलजी फुलदेवरे व दगडु पाटिल यांनी उपस्थितांचे आभार मानले. 👏










