राजश्री छत्रपती शाहू महाराज सृष्टी येथे सुरक्षा रक्षक नेमवा – तुषार हिंगे


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केसबी दसरा चौक येथील शाहूसृष्टी येथे तात्काळ उपाय योजना करा अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, (दसरा) चौक येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज सृष्टी तसेच माथाडी
कामगारांचे आराध्य दैवत स्व. आण्णासाहेब पाटील यांचा अर्धाकृती पुतळा अशा अनेक शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या गोष्टी आहेत. सध्याची स्थिती पाहता शाहू सृष्टीचे अंतिम टप्प्यातील काम सुरु असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या संपूर्ण परिसरात सध्या विद्युत रोषणाईचा आभाव असून त्यामुळे हा परिसर मद्यपींचा अड्डा बनू लागला आहे. भविष्यात एखादा गैरप्रकार येथे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सोबतच शाहू सृष्टीचा प्रवेशद्वाराचा परिसर आणि आतील भागात सुरक्षा रक्षक नसल्याने अनेकांचा वावर येथे आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोरील तसेच अण्णासाहेब पाटील स्मारका समोरील भागात वाढलेले गवत, सर्रास खासगी (बस) वाहनांचे पार्किंग यामुळे या भागात अनुचित प्रकार घडण्याला चालना मिळत आहे.

दसरा चौक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी उचित विद्युत रोषणाई आपण करावी, तात्काळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून त्याजागेतील वावर थांबवावा, छत्रपती शाहू
महाराज तसेच स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यासमोरील लावण्यात आलेल्या झाडांची योग्य पद्धतीने देखभाल करावी.










