Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील समृद्धी हिरालाल भोईर हिची “नॅशनल गेम्स पटना बिहार २०२५” हॅपटेथलोन इव्हेंटसाठी होणाऱ्या राष्ट्रीय युथ ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. राष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रशेखर कुदळे यांनी समृद्धी भोईर हिला प्रशिक्षण दिले आहे. शहरातील साई स्पोर्ट्स अकॅडमी संस्थेत ती प्रशिक्षण घेत आहे. गेली ६ वर्षे ती सातत्याने सराव करित आहे. नॅशनल गेम्ससाठी निवड होण्यापूर्वी तिने राज्य स्पर्धा गाजवलेल्या‌ आहेत. समृद्धी ही डी. वाय. पाटील महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत आहे. तिने या स्पर्धेसाठी सर्व प्रशिक्षण आणि सराव संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी येथे केलेला आहे. या स्पर्धेत समृद्धी हिने महाराष्ट्र राज्यासाठी पदक मिळवावे अशी पिंपरी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व प्रभारी बी. एम. संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात महापालिकेच्या गेट समोर धरणे आंदोलन घेण्यात आले. यावेळी आरोग्य ,पाणीपुरवठा, पर्यावरण स्थापत्य, वाहतूक विभाग शिक्षण विभागामधील अनेक समस्यावर आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बी. एम. संदीप यांनी राज्य सरकार तसेच पालिका प्रशासन दिल्ली ते गल्ली भाजप सरकार कसे भ्रष्टाचारात अखंड बुडाले आहेत याची माहिती दिली. तसेच शहराध्यक्ष कैलास कदम यांनी महापालिकेच्या मनमारी कारभाराचा पाढाच वाचला. कशाप्रकारे प्रशासनामधील अधिकारी व सत्ताधारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली (HMIS) अहवालानुसार राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालात १ एप्रिल २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ पर्येंतच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या विविध निकषांवर, विशेषतः कुटुंब कल्याण, मातृ व बाल संगोपन, तसेच नियमित लसीकरण कार्यक्रम यामध्ये पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने प्रसारित केलेल्या जानेवारी २०२५ च्या अहवालानुसार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने ९२ गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवांमधील उत्तुंग कामगिरी महानगरपालिकेच्या वैद्यकीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) पहिल्यांदाच “वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करत आहे. येत्या शनिवार व रविवार दि. ८ व ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा उपक्रम पिंपरी मार्केट परिसरात, साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक दरम्यान राबवला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे २३.२१ लाख वाहने असून, २५ लाख लोकसंख्या आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे, चालणे, सायकल चालवणे आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या पर्यायी आणि शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी मार्केट हा परिसर शहरातील सर्वात वर्दळीच्या भागांपैकी एक आहे. येथे अंदाजे ताशी ८,००० नागरिक ये-जा करतात. केवळ वाहनेच…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज, मंगळवारी (४ मार्च) ‘ड’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या विकास आराखड्यातील विकसित केलेल्या रस्त्यावरील करावयाचे वृक्षारोपण आणि दुभाजकामधील वृक्षारोपण याचे देखभाल दुरुस्ती कामांची पाहणी केली. पादचारी नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी रस्त्याच्या बाजुला असणारे पादचारी मार्गावर अतिक्रमण होऊ देऊ नका, रस्ता दुभाजकाची स्थिती चांगली ठेवा, रस्ता दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल करा, अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या. पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, पादचारी मार्गांवरून नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सातत्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मलकापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्राची तेजस्विनी गौरव पुरस्कार 202५ कार्यक्रमात पीसीएमसीच्या उद्योजिका, शिक्षणतज्ञ, इंग्लिश विषयाच्या नामांकित शिक्षिका आणि ऑनलाइन सर्विसेस मुळे जगभरात आपली उत्कृष्ट शिक्षण शैली पोहोचवणाऱ्या डॉक्टर स्मिता सातारकर यांना माणुसकी मल्टी पर्पज फाऊंडेशन, मलकापूर, जिल्हा बुलढाणा, संस्थापक विवेक राजापुरे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती महिला जिल्हाध्यक्ष मेधा डहाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्हे आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सोहळ्यात नुकतेच गौरविण्यात आले. या कार्यक्रमात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी डॉ. स्मिता सातारकर यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. त्यांनी आपल्या स्वरचित काव्यात्मक भाषणातून उपस्थित महिलांना प्रेरित करून त्यांचा गौरव केला.पुरस्कार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका २०२५- २०२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक २० संत तुकारामनगर येथील मुंबई पुणे महामार्ग लगत कै.यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून ते महेशनगर चौकापर्यंत तसेच अग्निशामक केंद्र ते कै.यशवंतराव चव्हाण रुग्णालय पर्यंतचा मार्ग काँक्रिटीकरण, पादचारी मार्गावर स्ट्रीट लाईट लावून अत्याधुनिक पद्धतीने सुशोभिकरण करण्यासाठी २० कोटी रुपया पर्यंतच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक निधी खर्चात मंजूर करण्यात आलेला असून सदर विकासकामांसाठी आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे मागणी केली होती त्यातील काही मागण्या त्यांनी पूर्णत्वास नेण्याकरिता २०२५- २०२६ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार मान्य केले आहेत, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानुसार प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर येथील…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या वतीने महाविद्यालयात शास्त्रज्ञ सी .व्ही . रामन यांच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी व प्राध्यापकासाठी संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची साधने व उपयुक्तता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे डीन व अभ्यासक वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर यावेळी उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, विभाग प्रमुख डॉ. जयश्री मुळे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्वांना नोकऱ्या देणे सरकारला शक्य नाही. रोजगाराच्या दृष्टीने कृषी क्षेत्र कमी पडत असल्याने उद्योग क्षेत्राला जवळ करणे क्रमप्राप्त ठरते. अध्यात्म आणि उद्योग हे हातात हात घालून पुढे जातील, हा स्वामी विवेकानंद यांचा विचार जे. आर. डी. टाटा यांनी महत्वाचा मानला. आज जो टाटा उद्योग समूह दिसतो आहे, तो या विचारांमुळेच, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योग महर्षी रतन टाटा पुरस्कारांचे वितरण ऑटो क्लस्टर सभागृह येथे पार पडले. यावेळी मावळमधील यशस्वी उद्योजक संदीप पवार यांना उद्योग महर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार देऊन श्रीपाल सबनीस यांच्या…

Read More

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात होते. सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्‍यांनी घेतला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली…

Read More