ताज्या घडामोडीपिंपरी

प्रभाग क्रमांक २० संत तुकारामनगर मधील विकास कामांकरिता २५ कोटी ४० लाख रुपयांचा अंदाजपत्रकीय खर्चात निधी मंजूर – योगेश बहल

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका २०२५- २०२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक २० संत तुकारामनगर येथील मुंबई पुणे महामार्ग लगत कै.यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून ते महेशनगर चौकापर्यंत तसेच अग्निशामक केंद्र ते कै.यशवंतराव चव्हाण रुग्णालय पर्यंतचा मार्ग काँक्रिटीकरण, पादचारी मार्गावर स्ट्रीट लाईट लावून अत्याधुनिक पद्धतीने सुशोभिकरण करण्यासाठी २० कोटी रुपया पर्यंतच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक निधी खर्चात मंजूर करण्यात आलेला असून सदर विकासकामांसाठी आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे मागणी केली होती त्यातील काही मागण्या त्यांनी पूर्णत्वास नेण्याकरिता २०२५- २०२६ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार मान्य केले आहेत, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानुसार प्रभाग क्रमांक २० संत तुकाराम नगर येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित विकास कामांचे प्रश्न आता मार्गी लागणार आहेत.

प्रभाग क्र.२० संत तुकारामनगर मधील काही महत्त्वाच्या विकासकामांची मागणी मा.आयुक्तांकडे करण्यात आली होती, त्यामध्ये प्रामुख्याने
•डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल विकसित करणे.
•सरदार वल्लभ भाई पटेल बॅटमिंटन हॉलचे नूतनीकरण करणे.
•संत तुकारामनगर येथील एसटी स्टँड समोरील आरक्षण क्रमांक वाणिज्य भूखंड पार्किंग व बस टर्मिनल
करिता आरक्षित असून सदर भूखंड विकसित करणे.
•स्वरगंगा, गंगा स्काईज सोसायटीच्या पाठीमागील अस्तित्वातील नाल्याची कामे करणे.
•संत तुकाराम नगर येथील मुंबई पुणे महामार्ग लगत कै.यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून ते महेशनगर चौकापर्यंत तसेच अग्निशामक केंद्र ते कै.यशवंतराव चव्हाण रुग्णालय पर्यंतचा मार्ग काँक्रिटीकरण, पादचारी मार्गावर स्ट्रीट लाईट लावून अत्याधुनिक पद्धतीने सुशोभिकरण, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या.

सन २०२५- २०२६ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार खालील विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात कै. यशवंतराव चव्हाण पुतळा ते महेशनगर चौकापर्यंत तसेच अग्निशामक केंद्र ते यशवंतराव चव्हाण रुग्णालय पर्यंत कॉंक्रिटीकरण व सुशोभीकरण २० कोटी राज्यांचा निधी व स्वरगंगा, गंगा स्काईज सोसायटीच्या पाठीमागील अस्तित्वातील नाल्याची कामे करणे कामी २ कोटी रुपये तर महेशनगर चौक सुशोभिकरणासाठी ४० लाख इतका आणि क्रीडा विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलमध्ये विविध खेळांसाठी ग्राउंड विकसित करून प्रेक्षक गॅलरी व छत विकसित करणे तसेच सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉलच्या नूतनीकरण करणे कामी क्रीडा विभागामार्फत तरतूद करण्यात आलेली आहे. एकूण विकास कामांकरिता २५ कोटी ४० लाख रुपयांचा अंदाजपत्रकीय खर्चात निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button