ताज्या घडामोडीपिंपरी

राज्यस्तरीय “तेजस्विनी महाराष्ट्राची”2025 हा पुरस्कार डॉ. स्मिता सातारकर यांना प्रदान

Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मलकापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्राची तेजस्विनी गौरव पुरस्कार 202५ कार्यक्रमात पीसीएमसीच्या उद्योजिका, शिक्षणतज्ञ, इंग्लिश विषयाच्या नामांकित शिक्षिका आणि ऑनलाइन सर्विसेस मुळे जगभरात आपली उत्कृष्ट शिक्षण शैली पोहोचवणाऱ्या डॉक्टर स्मिता सातारकर यांना माणुसकी मल्टी पर्पज फाऊंडेशन, मलकापूर, जिल्हा बुलढाणा, संस्थापक विवेक राजापुरे व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती महिला जिल्हाध्यक्ष मेधा डहाळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्हे आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सोहळ्यात नुकतेच गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी डॉ. स्मिता सातारकर यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते. त्यांनी आपल्या स्वरचित काव्यात्मक भाषणातून उपस्थित महिलांना प्रेरित करून त्यांचा गौरव केला.पुरस्कार मिळाल्यानंतर डॉक्टर स्मिता सातारकर यांनी सर्वांचे आभार मानले व या पुरस्काराचे खरे मानकरी त्यांचे विद्यार्थी आहेत असे सांगितले. इंग्रजी भाषा शिकवताना जो आनंद मला मिळतो त्या आनंदात उद्याच्या भारताची प्रगती सामावलेली आहे याचा मला जास्त आनंद असतो त्यामुळे हा पुरस्कार माझ्या आयुष्यामध्ये प्रेरणा देणारा आहे पुढे जाऊन मी पिंपरी चिंचवड शहरातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त इंग्रजी भाषेचे ज्ञान त्यांना मिळवून देण्यासाठी कुठलेही शुल्क न घेता नक्की प्रयत्न करेल.
आजचा मिळालेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडकरांचा बहुमान आहे असे आपल्या भाषणामध्ये डॉक्टर स्मिता सातारकर म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button