Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जापनीज इन्सेफेलायटिसला (मेंदूज्वर) प्रतिबंध घालण्यासाठी राज्यातील १ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक शाळेमध्ये महानगरपालिका अंतर्गत (बुधवारी दि.१२) जेई व्हॅसिनेशन कॅम्पेन राबविण्यात आले.लहान मुलांचे आता मेंदूज्वरापासून संरक्षण होणार आहे. मेंदूज्वरासारख्या (जेई) गंभीर आजारापासून बचावासाठी लहान मुलांना जेई लस अत्यावश्यक आहे, असे संस्थेचे अध्यक्ष संदीप काटे यांनी सांगितले. महानगरपालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने “जे.ई लस” हि शाळेत सर्व मुलांना देण्यात आली .सर्व विद्यार्थ्यांना ही लस मिळावी या संदर्भात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने कर वसुलीची कार्यवाही सुरु आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थसंकप्लातील उद्दिष्टाप्रमाणे कर वसुली दि. ३१ मार्च २०२५ पुर्वी करणेची असून उपरोक्त उद्दिष्ट्यपुर्ततेकरीता केवळ १८ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. हीच बाब लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मुख्य कार्यालय तसेच १८ विभागीय कर संकलन कार्यालय यापुढे शनिवार व रविवार चालू ठेवणेचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवारी व रविवारी कर भरता येईल. पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी १८ विभागीय कार्यालये कार्यान्वीत असून कराचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने कर भरण्याची सुविधा विभागीय कर संकलन कार्यलयामध्ये…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ सर्व्हेक्षणात अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ही स्पर्धा देशभरातून घेतली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या स्पर्धेत सामील झाली आहे. या स्पर्धेसाठी नागरिकांचे अभिप्राय महत्वाचे असून त्यास अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकाने आपला स्वच्छतेविषयक अभिप्राय देणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींला निवडणुक काळामध्ये दिलेले २१०० रुपयांचे आश्वासन पाळा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने पिंपरी-चिंचवड नायब तहसीलदार मनिषा लोंढे यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेच्या धामधूमीत तत्कालीन महायुतीच्या सरकारने निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आल्यावर महिलांना लाडकी बहिण योजने अंतर्गत मिळणार्या १५०० रुपये मानधन मिळणाऱ्या महिलांना त्यात वाढ करुन २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या मतदानाच्या आधारावर पुन्हा महायुतीचे सरकार देखील स्थापन झाले परंतु गेले दोन महिन्याचे मानधन देण्यातहि सरकार अपयशी ठरले आहे, २१०० रु. आश्वासन देऊनही काही महिलांच्या फक्त १५०० रुपयेच खात्यात जमा झाले आहे. त्यामुळे महिलांचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून, माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी बुधवार (दि. १२) मार्च रोजी महाराष्ट्राचे संवेदशील आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते स्व यशवंतराव चव्हाण (मा मुख्यमंत्री) यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तर्फे राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन व निदर्शन करण्यात आले. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पिंपरी चिंचवड, पुणे शहर च्या वतीने काळ्या फिती लावून पत्रकारांनी निवेदन दिले.यावेळी प्रदेशाध्यक्ष…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा देखील सन्मान पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या , उन्नती सोशल फाऊंडेशन आणि पी.के.इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्यरक्षक , धर्मवीर छ.संभाजी महाराज यांच्या अजोड पराक्रमाची साक्ष देणाऱ्या छावा चित्रपटाचा भव्य प्रीमिअर शो , पी.के.इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आला. या प्रीमिअर शो ला पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिक बंधू-भगिनी , अबालवृद्ध , तरुण-तरूणी यांनी उदंड प्रतिसाद दिला. छ.संभाजी महाराजांचा क्रूरकर्मा औरंगजेबाने केलेला ‘मृत्यूलाही देखील भय वाटेल असा केलेला छळ’ पाहताना पिंपळे सौदागर वासीयांच्या कडा पणावल्याचे पाहायला मिळाले. तत्पूर्वी , जागतिक महिला दिनाच्या औचित्याने विविध क्षेत्रात…

Read More

प्रवृत्ती निवृत्तीची कावड केवळ तुकोबांनी पेलली संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आयुष्यात प्रवृत्ती आणि निवृत्तीची कावड यांचे संतुलन ज्यांना राखता आले, ते संत तुकाराम महाराज हे एकमेव संत म्हणता येतील, असे प्रतिपादन हभप एकनाथ महाराज सदगीर यांनी केले. श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पाराण आणि कीर्तन सोहळ्यात अभंगाचे निरूपण करताना ते बोलत होते. प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ या अभंगावर सदगीर महाराज यांनी कीर्तन केले. प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण या दोन्ही धर्माचे भाग एकत्र आटवून, त्याचे अनुष्ठान करून त्यापासून चांगले भक्ती रसायन तयार केले;…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्याची पिढी घडवताना माणसं घडविणे हे शिक्षणाचे महत्वपूर्ण कार्य असून देशाचा जबादार नागरिक घडविण्याची जबाबदारी ही शिक्षक आणि शाळांवर आहे. महापालिकेच्या शाळेला पीएम श्री हा बहुमान मिळाला ही बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक विद्यालयात पीएम श्री उपक्रमाअंतर्गत “राष्ट्रीय शिक्षण २०२० –चला नवी पिढी घडवूया” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका मंजुषा टिळेकर,हर्षदा राऊत यांच्यासह पत्रकार, शाळेतील शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. संजय आवटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कलाकार, चित्रकार, साहित्यिक तसेच समाजातील सर्व बुद्धीजीवी घटकांनी बौद्धिक संपदा, त्याचे हक्क, महत्त्व, व्यावसायिक वापर याविषयी जागरूक रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पूरी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या सहयोगाने बौद्धिक संपदा हक्क विषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी प्र – कुलगुरू डॉ. सुदीप थेपाडे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सहाय्यक प्रा. निखिलेश, विभाग प्रमुख डॉ. वी. एन. पाटील, तज्ज्ञ सहा. प्रा. डॉ. सागर पांडे, प्रा. डॉ. नीरू मलिक आदी उपस्थित होते. प्र -…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महिलांच्या योगदानाचा सन्मान व्हावा तसेच त्यांच्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करणे महत्वाचे आहे. सर्व महिला वर्गाने एकत्र येऊन समानता आणि न्यायाच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक महिला स्वतंत्र, सुरक्षित आणि सशक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले तसेच सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास उपआयुक्त संदीप खोत, सिताराम बहुरे,…

Read More