- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर यासाठी मोठे पाऊल उचलत मोशी कचरा डेपो येथे अत्याधुनिक ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून शहरातील कचऱ्यापासून १४ मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती केली जात आहे. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्वावर उभारण्यात आलेला हा प्रकल्प मे. अँटोनी लारा रिन्यूएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीने ऑक्टोबर २०२३ मध्ये कार्यान्वित केला असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ऑगस्ट २०२५ पर्यंत या प्रकल्पाद्वारे ३ लाख ४१ हजार १११ मेट्रिक टन कचऱ्यापासून तयार इंधन ( Refuse Derived Fuel – RDF) वापरून १६ कोटी ६६ लाख…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यात सफाई सेवकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे असल्याने महापालिका नेहमीच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असते. यासाठी स्वच्छता सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच हेतूने आज हे सफाई सुरक्षा मित्र शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त सचिन पवार यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा – २०२५’ पंधरवड्यांचे औचित्य साधून डॉ. हेगडेवार क्रीडा संकुल अजमेरा कॉलनी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार बोलत होते. या शिबिराचे प्रास्ताविक करताना महापालिकेचे वैद्यकीय…
थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या पुढाकाराने थेरगाव येथे राबविण्यात आलेल्या “आमदार आपल्या दारी – संवाद, सेवा, समर्पण” या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात ७८३ नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले, तर अनेक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली. थेरगावमधील सोनाई मंगल कार्यालय येथे गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) आयोजित या शिबिरात प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचवणे हेच खरे जनसेवेचे उदाहरण आहे, असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात शासकीय योजना, दाखले, रेशनकार्ड, वीज, पाणी, ड्रेनेज, आरोग्य,…
एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ला “उडान ३” राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सह अनेक पारितोषिके पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये केलेल्या डान्स विथ म्युझिक यांच्या वतीने आयोजित केलेल्या “उडान 3” या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सह अनेक पारितोषिके पटकावली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातून चाळीसपेक्षा जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पीसीइटीच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते. एस.बी.पाटील पब्लिक स्कूल, रावेतच्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता चौथी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाड्यात अलीकडील अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक भावनेतून पिंपरी चिंचवड महापालिकेचे अपक्ष माजी नगरसेवक व माजी गटनेते कैलासबाबा बारणे यांनी पुढाकार घेत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याची मोहिम हाती घेतली आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत कैलास बारणे यांनी शालेय पिशव्या, वही, पेन, पेन्सिल, शालेय साहित्य संच अशा आवश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर छावा मराठा युवा महासंघाकडे सुपूर्त केला. महासंघाच्या माध्यमातून हे साहित्य मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचवण्यात येणार आहे. या उपक्रमावेळी छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सीना नदीच्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सोलापूरकरांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. एक हात मदतीचा या आवाहनाला प्रतिसाद देत माजी स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यात आले. यामध्ये अन्यधान्य, कपडे, साड्या, औषधे, ब्रश, तेल, साबण यासह विविध वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री तांदुळवाडी आणि उंदरगाव या पूरग्रस्त गावांमध्ये रवाना करण्यात आली. या उपक्रमात उमेश गायकवाड, मनोज तोरडमल, आदेश नवले, अनिकेत क्षिरसागर, मोहन राऊत, सौ. शिल्पाताई राऊत, दिलीप गडदे, दत्ताभाऊ ढगे, शिरीष कर्णिक, हनुमंत सकुंडे, प्रकाश आखाडे, महेश बारसावडे, नंदकुमार गौरे, राज बिराजदार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या महिन्याभरात मराठवाडा भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. हातातोंडाला आलेले शेतातील उभे पीक पावसाने वाहून नेले. शेती अक्षरशः खरवडून निघाली. बळीराजाच्या या संकटात पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चा नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या सोबत असून पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा दिला आहे. पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्त नागरिकांसाठी पुढाकार घेतला आहे. पिंपरी चिंचवड भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव व युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने 500 मदत किट तयार करून पूरपरिस्थितीत अडकलेल्या बांधवांसाठी पाठविण्यात येणार आहेत.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविणे आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण करण्याची संधी मिळत असते. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद आहेत. हे विद्यार्थी समाजातील गंभीर आव्हानांना उत्तर देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधतील आणि भारताच्या प्रगतीत योगदान देतील, असे गौरवोद्गार नियामक मंडळ सदस्य डॉ. पंडित विद्यासागर यांनी काढले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे “स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकथॉन २०२५” स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल च्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमधील नाविन्य व समस्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वास्तुकला हा एक विशाल व्यवसाय आहे. याची व्यापकता खूप मोठी असून यामध्ये अनेक संधी आहेत. कामाचे चक्र समजून घेणे आणि केवळ पैसेच नव्हे तर सद्भावना आणि मिळालेला आदर जीवनाला परिपूर्ण बनवतो, असे मत प्रसिद्ध वास्तुविशारद आणि संवर्धन तज्ज्ञ किरण कलामदानी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन (एसबीपीसीओएडी) येथे आर्किटेक्चरच्या २०२५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी एसबीपीसीओएडीच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी उपस्थित होत्या. किरण कलामदानी यांनी पालकांसोबत संवादातून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी विजयनगर येथील शांती कॉलनी ए, बी आणि सी भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी विजय सुतार यांना फोनद्वारे दिली. तक्रार मिळताच विजय सुतार यांनी कोणतीही विलंब न लावता स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दुसऱ्याच दिवशी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत लिकेज दुरुस्तीचे काम पूर्ण केले. या कार्यतत्परतेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत विजय सुतार यांच्या त्वरित प्रतिसादाचे कौतुक…
