काळेवाडी विजयनगर शांती कॉलनीत पाईपलाईन लिकेजवर तत्काळ कारवाई — विजय सुतार यांची कार्यतत्परता दाखवली झलक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी विजयनगर येथील शांती कॉलनी ए, बी आणि सी भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी विजय सुतार यांना फोनद्वारे दिली.
तक्रार मिळताच विजय सुतार यांनी कोणतीही विलंब न लावता स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दुसऱ्याच दिवशी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत लिकेज दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
या कार्यतत्परतेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत विजय सुतार यांच्या त्वरित प्रतिसादाचे कौतुक केले. “२४ तास तक्रार तुमची, कार्य आमचे” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवत त्यांनी पुन्हा एकदा जनतेत विश्वास निर्माण केला आहे.













