

प्रा.डॉ.अशोककुमार पगारिया यांना मनोहारी मैत्र संघाचा महात्मा फुले शिक्षण क्रांती पुरस्कार जाहीर
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी पुणे, पिंपरी चिंचवड मधील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील ज ज्येष्ठ कार्यकर्ते समाजसेवी अशोक कुमार पगारिया यांना पुणे येथील मनोहारी मैत्र संघाचा महात्मा फुले शिक्षण क्रांती पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी प्रीतम प्रकाश महाविद्यालयातील वर्धमान महावीर सभागृहामध्ये ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते दिला जाणार आहे. सदर पुरस्कार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणार आहे या कार्यक्रमासाठी रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड प्रमोद आडकर आणि शाहीर शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमल साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रा. पगारिया हे भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असून या संस्थेच्या मार्फत गेले 16 वर्षांपासून प्रीतम प्रकाश महाविद्यालय चालू आहे तसेच कासारवाडी येथील पार्श्वनाथ क्रीडा मंडळ याही संस्थेचे ते अध्यक्ष असून त्या संस्थेमार्फत आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल हेही गेली 26 वर्षापासून चालू आहे . या दोन्ही संस्थांमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत कधीही डोनेशन कॅपिटेशन फी अगर जास्त शुल्क आकारले गेलेले नाही सर्वसाधारण परिवारातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण कमी शुल्कमध्ये घेता यावे यासाठी डॉ अशोककुमार पगारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासरवाडी येथील पार्श्वनाथ सोसायटीमध्ये आचार्य आनंदऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल ची स्थापना केली या संस्थेमध्ये अतिशय कमीत कमी म्हणजे रु १० ते १५ हजार वार्षिक फी मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाते.अगदी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना नाममात्र फी मध्ये शिक्षण दिले जाते.या शाळेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर व सीए झाले आहेत.
भोसरी येथील प्रितम प्रकाश महाविद्यालयातही माफक फी आकारली जाते, डॉ अशोककुमार पगारिया हे कोंढवा येथील आर एम डी स्कुलचे संस्थापक सचीव आहेत तर अहिल्या नगर केडगाव येथील आनंद पार्श्व गुरुकुल स्कूल चे अध्यक्ष ही आहेत. ते निस्पृह पणे शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असून आवश्यकता असेल त्यावेळी स्वत: देणगी देऊन संस्था चालविण्यासाठी सहयोग करीत आहेत. म्हणूनच मनोहारी मैत्र संघाचे अध्यक्ष श्री मनोहर कोलते व त्यांच्या निवड समितीने डॉ अशोककुमार पगारिया यांची “महात्मा फुले,शिक्षण क्रांती या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.प्रा पगारिया विश्वस्त असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये सुमारे ४०००पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशी माहिती प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. सदाशिव कांबळे यांनी दिली आहे.



















