

महात्मा फुले यांना अभिवादन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्त्रीशिक्षण, बहुजनांचे शिक्षण, जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंचवड येथे अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दिली. आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आणि फेरीवाला क्रांती महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कष्टकरी कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार आजही शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला प्रेरणा देणारा आहे. थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना स्मरून आजही विधायक कामे करणे शक्य असल्याचे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.



















