
पुण्यात ‘करवा प्रिव्हे’ सोहळा उत्साहात संपन्न
परंपरा, सौंदर्य, संगीत आणि महिला भगिनींच्या स्नेहबंधांचा अनोखा संगम
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भारतीय संस्कृती आणि परंपरेचा सुंदर आविष्कार घडवणारा ‘करवा प्रिव्हे’ हा विशेष सोहळा पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मिसा हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ‘द एलिट थ्री’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी एलिट थ्रीच्या संस्थापिका प्रीत किलोचंदानी, ममता तेजवानी, मानवी गोविंदानी, तसेच अंजली वर्मा, निवेदक ईशान अत्मानी यांच्यासह शंभरहून महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
करवा चौथ या पारंपरिक सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, आकर्षक सजावट, संगीत आणि महिलांमधील स्नेहबंध यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. भारतीय संस्कृती आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुरेख संगम साधत महिलांनी या उत्सवाचा आनंद घेतला.
उत्सवी वातावरण आणि महिलांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महिलांना एकत्र येऊन परंपरा जपण्यासोबतच आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी या सोहळ्याच्या माध्यमातून मिळाली.
‘करवा प्रिव्हे’ या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय परंपरा, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक स्नेहभाव यांचा सुंदर संदेश देण्यात आला.



















