
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सणासुदीच्या काळात महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंना ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्यास त्यांच्या व्यवसायवृद्धीस मदत होणार आहे.
हे प्रदर्शन ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. पिंपरीतील पिंपळे हॉल शेजारी, के. शंकरराव तुकाराम मासुळकर टॉवर्स झोन, मासुळकर कॉलनी येथे नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे.
महिलांच्या मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक महिला उद्योजिकांकडून दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



















