
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने पवना नदी व घाट स्वच्छता अभियान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने रिव्हर व्ह्यू घाट बिर्ला हॉस्पिटल रोड चिंचवड पुणे येथे आज नदी व घाट स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एक तास नदीसाठी एक तास स्वच्छतेसाठी या मुक्ती प्रमाणे आज संस्कार प्रतिष्ठानचे 40 सभासद नदी स्वच्छता अभियानासाठी पुढे धावले.
घाटावरील गवत पायऱ्यांवरील गवत तसेच प्लास्टिकचा कचरा नदीपात्रात पडलेले प्लास्टिक विविध प्रकारचे हार पिशव्या नदीपात्रातून काढून घेण्यात आल्या तसेच संपूर्ण घाटावर साफसफाई करण्यात आली संपूर्ण घाटाची स्वच्छता झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा घोषणा दिल्या त्यानंतर स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली
स्वच्छ भारत सुंदर भारत स्वस्थ भारत
या स्वच्छता अभियानात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.समारोप प्रसंगी सर्व सभासदांनी स्वच्छतेची शपथ घेतली. आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर इतरांनाही स्वच्छता राखण्यास प्रवृत्त करू अशी सर्वांनी ग्वाही दिली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड,मनोहर कड, सुधाकर खुडे,प्रभाकर मेरुकर,संध्या स्वामी,आरोग्य अधिकारी प्रकाश खलसे,संस्कार प्रतिष्ठानचे सभासद पल्लवी नायक, सिद्धी जोशी, कविता वाल्हे, पांडुरंग सुतार,अरुण कळंबे, विलास सैद ,जयवंत सूर्यवंशी, बाजीराव पतंगे,जितेंद्र जाधव, सतीश उघडे,रमेश भिसे,शिवाजी पाटील,धनंजय सावंत,शुभदा फूलंबरकर,डॉ.ए एम फुलंबरकर सहभागी झाले होते.



















