
नवी सांगवी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबाद प्रमाणे याही वर्षीची पिंपळे गुरव,नवी सांगवी विभागीय येथील श्री.दुर्गामाता दौड जोमात पार पडत आहे. २०२० साली लावलेल्या छोट्याशा रोपट्याच आज एका मोठया वटवृक्षात रूपांतर होत आहे.श्री दुर्गामाता दौड का ? कशासाठी ? त्याच महत्व काय ? असे अनेक प्रश्न पडतात.. तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी नवरात्री मध्ये उपवास करून पोटी एक असा पुत्र मागितला जो की परकीयांच्या आक्रमणा पासून आणि जुलूमापासून निष्पाप जनतेला मुक्त करेल,त्यांच्यावर होणारा अन्याय,अत्याचार दूर करेल आणि घडलही तसच श्री.हिंदू धर्म संस्थापक छत्रपती शिवरायांनी परकीयांना खदेडून लावल आणि एका सुंदर स्वराज्याची स्थापना केले.अठरा पगड जातींना एकत्र केले आणि धर्माची स्थापना केली.
आज पाहायला गेलं तर आपला सगळं देश जाती – पाती मध्ये गुरफटला गेला आहे.आपला समाज आणि तरुण पिढी एका खोल अंधारात लोटला गेला आहे.नवपिढी विस्कळीत होऊन चुकीच्या मार्गाला लागली आहे.म्हणूनच आपण ही
श्री.दुर्गामाता दौड चालू केली. आणि यातून आपण सर्व जनतेचं एकत्रिकरणाचं कार्य सुरु केलं.
यामुळे नवपिढी एकत्र जमू लागली,अठरा पगड जाती एकत्र आल्या,तरुणांना योग्य ती दिशा मिळू लागली,नवं तरुणांच्या अंगी शिस्त बांधली जाऊ लागली,योग्य ती शिकवण मिळू लागली.
चिखलाच्या गोळ्यांना योग्य तो आकार मिळू लागला आणि या दुर्गामाता दौडीच्या कार्यातून शेकडो नवयुवक घडू लागले.
हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता काही मोजक्याच लोकांपासून सुरुवात झाली होती आणि आज त्याच प्रयत्नाच्या जोरावर प्रचंड समुदाय दुर्गा माता दौडसाठी जमू लागला.थांबतील ते मावळे कसले..
श्री.छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी आणि धर्म जागृतीसाठी खूप सारे तरुण युवक कार्य करत आहेत.
या श्री.दुर्गामाता दौडीतून सर्वाना आव्हान करूयात की सर्व हिंदू समाजानं एकत्र यावं या दौडीत सामील व्हावं आणि आपली समाजाप्रती असलेलं कर्तव्य पूर्ण पाडावं.ही फक्त दौड नाही ही एक आयुष्यातली सर्वात महत्वाची जबाबदारी आहे.
या श्री दुर्गा माता दौड मध्ये सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे म्हणाले की श्री दुर्गा माता दौड मधे आजच्या तरुण पिढीने उस्फूर्तपणे सहभाग भाग घेतला पाहिजेयामुळे आपले पारंपारिक मराठी संस्कृतीचे शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र करून हिंदवी स्वराज्य उभे केले याची प्रेरणा आजच्या तरुण पिढीने घ्यावी.
याप्रसंगी नवी सांगवी विभाग सुरवात करणारे – निशिकांत वानखडे,सुशांत पोतदार,साई कोढंरे,सचिन बंडगर,अजिंक्य बोरडे, नगरसेविका दीप्ती कांबळे स्वप्नील सावंत,अमोल सुतार,प्रशांत ढोबळे,शुभम गावडे,भागवत भांडे,ओमकार भिर्वे,ओम देशमुख,प्रतीक भोसले आदी दुर्गा दौडचेदरवर्षी यशस्वी आयोजनामधे सहभागी घेणारे तरुण व नागरिक उपस्थितात होते.



















