
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रत्येक स्त्रीमध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. तिच्या स्वप्नांना बळ देणे, तिच्या कर्तृत्वाला योग्य सन्मान मिळवून देणे आणि तिला प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. महिलांना केवळ सन्मानाचे शब्द देऊन चालणार नाही, तर त्यांच्या प्रश्नांवर ठोस कृती करणेही आवश्यक आहे, असा विचार शिक्षण समिती सभापती रविना आंघोळकर त्यांनी मांडले .
“महिलांच्या ताकदीला सन्मानाने पुढे आणूया, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया आणि महिलांसाठी काय करता येईल, यासाठी एकजुटीने लढूया,” असे आवाहन रविना आंघोळकर यांनी केले.
महिलांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचा संदेश देणारा त्यांचा विचार नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीच्या जागराला नवी दिशा देणारा आहे.



















