
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी राबविण्यात आलेल्या एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी मोहिमेतील ८०१ हून अधिक लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, अपर्णा डोके, मनिषा चिंचवडे आणि भाजपा उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले.
या वेळी प्रभागातील मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते. शासनाच्या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात सवलत मिळण्यासाठी हे स्मार्ट कार्ड उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेमुळे प्रभागातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार असून, भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी अशा लोकाभिमुख योजना राबविण्यात येतील, असे नगरसेवक सुरेश भोईर यांनी सांगितले.



















