
मासुळकर कॉलनीत महिलांसाठी गरबा प्रशिक्षण शिबिर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मासुळकर कॉलनी परिसरातील महिलांसाठी नगरसेविका सौ. सारिका विशाल मासुळकर यांच्या विशेष प्रयत्नातून गरबा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण शिबिर शुक्रवार, २ ऑक्टोबर ते रविवार, ४ ऑक्टोबर या कालावधीत दररोज दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, स्केटिंग ग्राउंड, मासुळकर कॉलनी येथे हे शिबिर होणार आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, इच्छुक महिलांनी सौ. सारिका विशाल मासुळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी ९७६६५९२२१५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

















