
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गणेश महोत्सवाचे औचित्य साधून वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीत फुलोरा निर्मित ‘माझा बाप्पा किती गोड…’ या नूतन गीताचे लोकार्पण संपन्न झाले.
एस.एन.बी.पी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी, पुणेच्या प्राचार्या जयश्री व्यंकटरमण यांच्या हस्ते संपन्न झालेल्या गीत लोकार्पण सोहळ्यात मुख्याध्यापिका गीता गर्ग, वर्गशिक्षिका जुई चाळके, संचालक डी. के. भोसले, वृषाली भोसले, देवयानी भोसले, ऋतुजा भोसले, प्रियंका अग्रहरी, योगेश मिश्रा, कविता शर्मा, गीतकार – संगीतकार अभय कुलकर्णी आणि अर्पिता कुलकर्णी तसेच बालश्री पुरस्कारप्राप्त गायक अथर्व कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. एस. एन. बी. पी. इंटरनॅशनल स्कूलमधील दहा वर्षे वयाची विद्यार्थिनी भाग्यदा कुलकर्णी या बालगायिकेचा स्वर या गीताला लाभला आहे. यावेळी जयश्री व्यंकटरमण यांनी भाग्यदाच्या सूर तालाचे कौतुक करीत ती आमच्या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा अभिमान वाटतो, अशी भावना व्यक्त केली; तसेच शाळेतील शिक्षकांनी भाग्यदाच्या पार्श्वगायनाचे कौतुक करीत सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षकवृंदाने नृत्य गायनासह, ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत सहभाग घेतला. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे संचालक तसेच गीत फुलोरा कार्यक्रमाचे निर्माते अभय कुलकर्णी आणि अर्पिता कुलकर्णी यांनी बालगणेश सर्व मुलांना आवडतो. त्याच्याशी शब्द – सुरांच्या माध्यमातून मैत्री व्हावी म्हणून गणेशोत्सवानिमित्त या विशेष गीताची निर्मिती करण्यात आली असून हे गीत सोशल मीडियावर गीतफुलोरा
(Geetfulora) या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे, अशी माहिती दिली.
त्या गीताचे संगीतकार अभयार्पिता असून या गीताचे संगीत संयोजन राष्ट्रीय बालश्री पुरस्कार प्राप्त अथर्व कुलकर्णी यांनी केले आहे

















