
अहिल्यानगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अहिल्यानगर येथील गेली वीस वर्षे धार्मिक आणि शैक्षणिक कामामध्ये अग्रेसर असलेल्या आणि राष्ट्रसंत, आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषीजी म सा यांचे सुशिष्य महाराष्ट्र प्रवर्तक पू श्री कुंदनॠषिजी म सा यांच्या प्रेरणेने आणि संस्कार दिवाकर पू श्री आलोकॠषिजी म ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या आनंद नवकार परिवार ट्रस्ट या संस्थेच्या अध्यक्षपदी पुढील तीन वर्षासाठी पुणे, पिंपरी चिंचवड येथील जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ , भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सनदी लेखापाल डॉ अशोककुमार पगारिया यांची तसेच उपाध्यक्षपदी कोल्हार जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री नंदकुमार भटेवरा सचिव पदी अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मनोजकुमार शेटिया आणि तर खजिंदार पदी अहिल्यानगर येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल सीए रवींद्र कटारिया यांची निवड झाली. इतर ट्रस्टी खालील प्रमाणे :- धीरजकुमार जैन , दुबई – पुणे, नितीनकुमार कु़ंकुलोळ , कोल्हार भ., मेघा बोरा, अहिल्यानगर, श्री प्रतिक चोरडिया, अहिल्यानगर , श्री शैलेश मेहर अहिल्यानगर .
या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या अनेक श्रावक संघामध्ये आनंद जैन पाठशाळा चालवल्या जात आहेत. एकूण 150 पेक्षा जास्त आनंद जैन पाठशाळा आनंद नवकार परिवार ट्रस्टच्या माध्यमातून संचलित केल्या जात आहेत. या शाळांमध्ये सुमारे 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत आहेत. गेल्या अकरा वर्षापासून या संस्थेच्या वतीने आनंद पार्श्व प्री प्रायमरी स्कूल, नवी पेठ येथील स्व. श्री रमेशचंद्रजी बाफना यांच्या ऑफिस मध्ये चालू असून गेल्या तीन वर्षापासून अकोळनेर रोड ,केडगाव येथील नवीन इमारतीमध्ये आनंद पार्श्व प्री प्रायमरी आणि प्रायमरी स्कूल सुरू झाले आहेत. एकुण 200 पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सुमारे साडेपाच एकर जागा संस्थेच्या मालकीची असून या जागेवर 30,000 स्क्वेअर फुट ची श्री आनंद पार्श्व गुरुकुलची 4 मंजिल भव्य इमारत पूर्ण झाली असून त्याच ठिकाणी गुरुकुल शाळा चालू आहे. भविष्यामध्ये ज्युनिअर कॉलेज आणि सीनियर कॉलेज सुरू करण्याचा संस्थेचा मनोदय आहे. महाराष्ट्र प्रवर्तक परम पूज्य कुंदनॠषिजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आणि पूज्य श्री आलोकॠषिजी म सा यांच्या मार्गदर्शनाने संस्थेचे सर्व कामकाज प्रगतीपथावर चालू आहे.

















