
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – युवा उद्योजक आणि निष्ठावंत शिवसैनिक गणेश आहेर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या आणि पक्षाशी निष्ठेने जोडलेल्या गणेशशेठ आहेर यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तसेच शिवसेनेची विचारधारा आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी भूमिका आहेर यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, आहेर यांच्या नियुक्तीबद्दल शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष संघटनात्मक पातळीवर अधिक सक्रिय करण्याची जबाबदारी आता गणेशशेठ आहेर यांच्यावर आली आहे.

















