
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाल्हेकरवाडी येथील अष्टविनायक मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणरायाची आरती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गणरायाचे दर्शन घेत आरती केली.जय महाराष्ट्र मित्र मंडळ
या प्रसंगी जिल्हा संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख वैशाली काटकर, उपशहर संघटिका तस्लिम शेख, योगिनी मोहन, विभाग संघटिका वंदना खंडागळे, वंदना वाल्हेकर, उपविभाग संघटिका हर्षाली घरटे, तसेच अक्षय रणदिवे, रोहित काटकर, राहुल बबन भालके, निखिल काळुराम भालके आदी उपस्थित होते.
यावेळी गणरायाची आरती करून उपस्थितांनी मंडळाच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

















