
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दि ०५.११.२०२६ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष बॉम्बशोधक व नाशक पथकाद्वारे न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली.
यावेळी बॉम्बशोधक पथकातील प्रशिक्षित श्वानाच्या (डॉग स्क्वॉड) मदतीने न्यायालयाची इमारत, प्रवेशद्वार, न्यायालयातील विविध विभाग तसेच संपूर्ण परिसराची सखोल पाहणी करण्यात आली. न्यायालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा संभाव्य धोका नाही ना, याची दक्षता घेण्यासाठी ही तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या माजी उपाध्यक्ष ॲड. योगेश थंबा (कव्हेकर ), महिला सचिव. रीना मगदूम माजी महिला सचिव ॲड. कांता गोर्डे तसेच मा.अध्यक्ष ॲड.किरण पवार, माजी खजिनदार ॲड.संदीप तापकिर बॉम्बशोधक पथक अधिकारी अनंत चव्हाण, प्रवीण ढोरजे , अनिल साळुंखे यांच्यासह न्यायालयातील वकील उपस्थित होते.
न्यायालयात दररोज मोठ्या संख्येने न्यायाधीश, वकील, पक्षकार, नागरिक तसेच कर्मचारी येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या सुरक्षा तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही तपासणी महत्त्वपूर्ण ठरली.



















