
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, निगडी येथील श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त १९९२ ते २००२ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी निर्धार व्यक्त
स्नेहबंधनांना पुन्हा उजाळा दिला. प्राचार्य हनुमंत मारकड यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. माजी विद्यार्थी अडवोकेट गजानन खैरे, संगणक अभियंता स्मिता मुथा , उद्योजक पूजा लोढा, केतकी कुंभार डॉ.अश्विनी पाटील, उद्योजक गिरीश धांडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष बागुल, उद्योजक स्वप्निल शहा, मंदार गायकवाड, रवींद्र जवळेकर, विशाल बिरारीस, केतकी कुंभार यांनी मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
गुरु गणेश शाळेचे माजी विद्यार्थी अँड. गजानन खैरे यांनी सांगितले की शाळेमध्ये आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा येतो. शाळेमुळे मिळालेल्या संस्कार खूप महत्त्वाचे होते असल्यामुळे आम्ही समाजामध्ये उभे आहोत. शाळेसाठी आपण दातृत्वाचे भावना दाखवली पाहिजे आणि संस्थेला हातभार लावला पाहिजे. असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
माजी शिक्षक धोंडीबा हांडे आणि उमाकांत काळे उपस्थित होते. संस्थाप्रमुख सुरेश आणि शिक्षक सुभाषक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. उज्वला कोल्हटकर यांनी सूत्रसंचालन केले.



















