
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवात डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजा, महाआरती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. जलप्रदूषण टाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणे यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
“गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही देखील आपली सामाजिक जबाबदारी आहे. भक्तीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,” असे संकुल संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी सांगितले.
“गणेशोत्सवामुळे संपूर्ण महाविद्यालयीन परिसरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि पर्यावरणपूरक विसर्जनातून संस्कृतीसोबतच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले,” असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सांगितले.

















