
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विश्वबंधुता साहित्य परिषद आणि सहयोगी संस्थांच्या वतीने पहिल्या संविधान सन्मान महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अॅड. प्रार्थना सदावर्ते यांची, तर स्वागताध्यक्षपदी बंधुता प्रकाशनच्या संचालक मंदाकिनी रोकडे आणि कार्याध्यक्षपदी विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या सचिव प्रा. सायली गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
विश्वबंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे, मूल्य संवर्धन समितीच्या अध्यक्ष प्रा. भारती जाधव, काव्यमंचचे अध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे, काषाय प्रकाशनचे संचालक प्रा. चंद्रकांत वानखेडे आणि बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रशांत रोकडे यांनी नियोजनासाठी विशेष पुढाकार घेतला आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

















