
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ३ व ४ सप्टेंबर २०२६ रोजी IEEE International Conference on Electronics, Computing, Communication and Networking Technologies (ICEC2NT-2026) या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती यांनी ही माहिती दिली.
या परिषदेत तब्बल २५० शोधनिबंध सादर केले जाणार असून, भारतातील विविध राज्यांतील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांसह अमेरिका, सौदी अरेबिया आणि इराक येथील संशोधक सहभागी होणार आहेत.
परिषदेसाठी बंगळुरूचे डॉ. मनीष बाली व श्री. मयूर कौलवकर, अमेरिकेतील साउथ फ्लोरिडा येथील प्रा. भुवन उन्हेलकर, युनायटेड किंगडममधील वेल्स विद्यापीठाचे प्रा. इझेंडू अरिवा, फिलिप्स इंडियाचे संचालक श्री. आशिष शहा, VJTI मुंबईचे प्रा. डॉ. फारुख काझी, IEEE पुणेचे प्रमुख डॉ. अमर बुचडे तसेच संस्थेचे विश्वस्त श्री. तेजस पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.
या परिषदेमुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना, संशोधन आणि ज्ञानाची देवाणघेवाण होण्यास मदत होणार आहे. कॉम्प्युटर व आयटीसारख्या सॉफ्ट ब्रांचेसमधील तंत्रज्ञानाचा उपयोग इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगसारख्या कोअर ब्रांचेसमधील विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल, असे कॅम्पस डायरेक्टर रियर अॅडमिरल अमित विक्रम यांनी सांगितले.
प्रा. डॉ. पी. मालती, प्रा. डॉ. बी. बी. मुसमाडे, प्रा. डॉ. ऋतुजा देशमुख आणि प्रा. डॉ. प्रीती पाटील हे परिषदेचे संयोजक म्हणून काम पाहत आहेत.परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी डी. वाय. पाटील आकुर्डी संकुलाचे चेअरमन सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, सौ. स्नेहा तेजस पाटील, प्राचार्या डॉ. पी. मालती पाटील आणि संचालक रियर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

















