ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरीसांस्कृतिक

श्रीमंगलमूर्तींच्या माघी रथयात्रेला आजपासून सुरुवात

Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज हे दरमहा मोरगाव येथे श्रीमयुरेश्वराच्या दर्शनास जात असत. श्री मोरया गोसावी महाराजांना वयाच्या ११७ व्या वर्षी सन १४८९ मध्ये मयूरेश्वराची तांदळा मूर्ती मोरगाव येथील गणेश कुंडात प्राप्त झाली. वार्धक्यामुळे श्री मोरया गोसावी दरमहा न जाता फक्त माघ व भाद्रपद महिन्यात मोरगाव येथे जावू लागले.
चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची प्रसादमुर्ती माघ महिन्यात रथातून पालखी मोरगाव येथे घेऊन जाण्याची ही परंपरा गेली सुमारे ५२६ वर्ष पेक्षा अधिक काळ अविरत सुरू आहे.
ही माघी रथयात्रा आज शनिवारपासून (ता. १०) सुरू झाली आहे. २० फेब्रुवारीला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली. पालखी सोहळ्याचे वेळापत्रकही त्यांनी यावेळी जाहीर केले.
पालखी प्रस्थानाच्या निमित्त मोठी मिरवणूक काढली. शनिवारी दुपारी बारा वाजता पालखीचे प्रस्थान झाले. श्री मंगलमूर्ती वाडा ते मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर, गांधीपेठ, चिंचवड लिंकरोड, जुना मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा मार्गे जाऊन एकनाथ मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम व धुपार्ती होईल.

रविवारी (ता. ११) पहाटे साडेचार वाजता भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून श्री कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम व धुपार्ती होईल. पालखी सोमवारी (ता. १२) सकाळी ६ वा. मंदिरातून शिवरी, रासकर मळा, श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळा मार्गे रात्री नऊ वाजता मोरगाव येथे पालखी पोहोचणार आहे.

त्यानंतर मंगळवार (ता. १३) आणि बुधवारी (ता. १४) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. गुरुवार (ता.१५) रोजी पालखी मोरगाव येथून जेजुरी कडे प्रस्थान करेल व मुक्काम जेजुरी येथे असेल. शुक्रवार (ता. १६) रोजी जेजुरी येथून निघून पालखीचा मुक्काम सासवड येथील कऱ्हाबाई मंदिरात असेल. शनिवार (ता. १७) रोजी पालखी सासवड येथून दिवे घाट, हडपसर, सोलापूर रोड मार्गे जाऊन पालखीचा मुक्काम थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर येथे व धुपार्ती होईल. रविवार (ता. १८) रोजी पाटस, दौंड, शिरापूर मार्गे जाऊन पालखीचा मुक्काम सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे व धुपार्ती होईल.

सोमवार (ता. १९) रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. दौंड, पाटस, सोलापूर रोड, हडपसर, पुलगेट मार्गे एकनाथ मंगल कार्यालय, पुणे या ठिकाणी मुक्काम करीत २० फेब्रुवारीला पालखी परत चिंचवड येथील महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरात येईल व धुपार्ती होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button