ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी

महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायम पाठीशी – इरफानभाई सय्यद

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस विविध सेवा शिबिरांच्या माध्यमातून उत्साहात साजरा

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साधेपणा, उच्च विचारसरणी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं शिवेनेचं खंबीर नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी भोसरी मतदारसंघात मोठ्या उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. कोणताही सार्वजनिक डामडौल न करता अत्यंत साधेपणाने वाढदिवस साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दिव्यांगांना उपयुक्त सामुग्रीचे वाटप, विविध शालेय स्पर्धा, चिञकला व निबंध स्पर्धा, वृध्दाश्रमात अन्नदान यांसारख्या विधायक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची सेवा घडावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उपनेते तथा मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सेवा शिबिरांचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना शुभेच्छा दिल्या.

या सेवा कार्यात शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ, युवासेना पुणे उपजिल्हाप्रमुख अरूण जोगदंड, शिवसेना भोसरी विधानसभाप्रमुख दत्तात्रय भालेराव, महिला आघाडीच्या मनीषा परांडे, मनीषाताई पवार, उपशहर प्रमूख बळीराम जाधव,वैद्यकीय कक्ष शहरप्रमुख सुनील पवार भोसरी विधानसभा संघटक संदिप जाधव, आशिष गौंड, दत्ता औरळे, साईनाथ ढाकणे, सागर पाचर्णे, रोहित जगताप, पप्पू चौधरी, नुर शेख, महाराष्ट्र मजदुर संघटनेचे प्रवीण जाधव, नागेश व्हणवटे, अमित पासलकर, रत्नाकर भोजने, समर्थ नाईकवाडे, अनिल खपके, चंद्रकांत पिंगट तथा शिवसेना युवासेना  महीला आघाडी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आदींचा सहभाग लाभला.

दरम्यान न्यू महाराष्ट्र विद्यालय रुपीनगर, तळवडे या विद्यालयात विविध शालेय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्री. शिवछञपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मोरेवस्ती चिखली या विद्यालयात चिञकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रुपीनगरमध्ये दिंव्यांग बांधवांना मदत तथा अन्नदान केले. शिवसेना शहर पदाधिकारी तथा शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या वतीने विकास अनाथ आश्रम, चिखली, सावली निवारा केंद्र, पिंपरी वृध्दाश्रम या ठिकाणी अन्नदान करण्यात आले. साहेबांना दिर्घायुष्य लाभो यासाठी वडमुखवाडी येथील श्री. साईबाबा चरणी प्रार्थना करण्यात आली. तसेच मंदिरात भक्तांना ६० किलो लाडू प्रसाद स्वरूपात वाटण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकारणाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या लोककारणाचा मंत्र जपणारे मुख्यमंत्री अशी आज एकनाथजी शिंदे साहेब यांची संपूर्ण हिंदुस्थानात छबी निर्माण झाली आहे. मातीशी नाळ घट्ट जोडणारा शेतकरी म्हणून ते आजही स्वत: शेतीत नांगर धरतात. एखादी दुर्घटना घडली की तत्काळ मदतीसाठी धावून जाणारा अवलिया म्हणून देखील ते आज सर्वाना परिचित आहेत. स्वपक्षीय असो अथवा विरोधक त्यांच्या हाकेला ओ देणारा राजकारणापलीकडचा मित्र म्हणून देखील आज ते सर्व नेतेमंडळींमध्ये परिचित आहेत.

लोककल्याणाकरिताच्या निधीसाठी हात आखडता ते घेत नाहीत. तत्सम सुविधा उपलब्ध करून देतानाही ते मागे पुढे पाहत नाहीत. याचा अनुभव विरोधी पक्षातल्याच अनेक नेते मंडळींनी घेतला आहे. त्यांच्या सरकारच्या जनताभिमुख राजकारणामुळे जनकल्याणाच्या अनेक योजना आज शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. पायाला भिंगरी लावून मागच्या काही महिन्यांत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. स्वाभाविकच महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिंदे साहेबांनी आणलेला नवा ट्रेंड सर्वांसाठीच दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरत आहे. हे यश कायम टिकून राहिल यासाठी संपूर्ण शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे आणि राहील. अशी ग्वाही त्यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून आम्ही देत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button