Author: maharashtrabreakingnews.com

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभेचे दमदार आमदार पै. महेश लांडगे यांच्या विशेष सहकार्याने व शांताराम बाप्पू भालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त २८ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत त्रिवेणीनगर चौक तळवडे मधील Gi इलेक्ट्रॉनिक्स अँड कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्स वर 70% पर्यंत दरात सूट मिळणार आहे. त्यामध्ये स्मार्ट टीव्ही, घरगुती आटा चक्की, वॉटर प्युरिफायर, कुलर व इत्यादी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. Gi इलेक्ट्रॉनिक्स अँड कंपनीचे उद्घाटन टाटा मोटर्स युनियन लीडर  सचिनभैय्या लांडगे,  नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर,  अरुणा भालेकर, कमल घोलप,   पांडुरंग भालेकर, युवा नेते  निलेशअण्णा भालेकर, उद्योजक  बापू घोलप, सामाजिक कार्यकर्ते दादा कवितके, ह.भ.प. आव्हाड महाराज व आदी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी…

Read More

च-होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –    च-होलीतील (काळे कॉलनी) येथील पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल आणि किड्स पॅराडाईजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. शाळेचे अध्यक्ष अनंत काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व देशभक्तीपर नाट्य सादर करण्यात आले.नवनाथ काळे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना देशप्रेम व स्वतःचे अनुभव कथन केले आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर पडल्यावर कोणत्याही प्रकारची आडचण येऊ नये अशा प्रकारचा  सर्वागीण विकास त्यांच्या मध्ये घडवतो. संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाळेत साजरा होणाऱ्या जयंती पुण्यतिथी यातून आम्ही मुलांच्या अंगात देशभक्ती रुजवित आहोत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे  हेच आमच्या शाळेचे मुख्य उद्देश आहे त्यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुकडा तुकडा चंद्र कथासंग्रहाचे प्रकाशन स्वाती वैद्य यांच्या कथा जगण्यातील सकारात्मकता आणि चांगुलपणा यांना चित्रित करणाऱ्या असून त्यात मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म दर्शन घडते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक अभिराम भडकमकर यांनी केले.स्वाती वैद्य यांच्या ‘तुकडा तुकडा चंद्र’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे,लेखिका मृणाल खडक्कर आणि प्रकाशिका प्रा. रुपाली अवचरे मंचावर उपस्थित होते. समाजातील सारीच स्थित्यंतरे मानवी जगण्याला, नातेसंबंधांना प्रभावित करणारी असतात.समर्थ लेखक ती अचूक टिपतो.कोरोना काळातील स्थित्यंतरे मात्र साहित्यात अजूनही परीणामकारक रीतीने उमटलेली नाहीत.स्वाती वैद्य यांनी मात्र ती प्रभावीपणे रेखाटली आहेत.त्यादृष्टीने त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह अतिशय आश्वासक आहे.असे गौरवोद्गार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या ७५ वा  प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ०९.०० वाजता शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अजित गव्हाणे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही  सर्व नागरीक असल्याचे आम्हां सर्वांना सार्थ अभिमान असून संविधानाच्या आधारावर सर्वसामान्य नागगरीकांचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष  कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मा.उपमहापौर मोहंम्म्द पानसरे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, ओबीसी अध्यक्ष  विजय लोखंडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवती…

Read More

        पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले  व खर्या अर्थाने  या देशात नागरिकांची सत्ता आली म्हणून आपण प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व अथक प्रयत्नांनी जगातील सर्वात  मोठे लिखित संविधान या देशाला मिळाले.        ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने खराळवाडी येथील पक्ष कार्यालयावर महाराष्ट्र महासचिव अकील मुजावर  व शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते  ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीतं व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष विविध राज्यात चाचपणी करत आहेत. भाजप विरोधात देश पातळीवर इंडिया आघाडी स्थापन केल्याने आघाडीतील जागा वाटपावरुन विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.अरविंद केजरीवाल यांना महाराष्ट्रात मावळ लोकसभा मतदारसंघात आपचा उमेदवार उभा करण्याची विनंती रविराज काळे या तरुणाने केली आहे. अशात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीसुद्धा स्वबळावर लढणार या वक्तव्याने खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौरा करुन राज्यातील लोकसभा जागावाटपाबाबत इंडिया आघाडीसोबत चर्चा सुरु असल्याचे सांगितले. निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले.           रविराज काळे यांनी सध्याच्या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “उर्दू ही संपूर्ण हिंदुस्थानाची भाषा असून ती आम्हाला परंपरा आणि रीतिरिवाज शिकवते!” असे विचार बीना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक – अध्यक्ष इक्बाल खान यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे व्यक्त केले. अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बीना एज्युकेशनल सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया उर्दू मुशायऱ्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे शनिवार, दिनांक २७ जानेवारी २०२४ आयोजित करण्यात आलेल्या या मुशायऱ्याला आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी – चिंचवड महापालिका शहर सहअभियंता मनोज सेठीया, सामाजिक कार्यकर्ते जयदीप खापरे, सुशांत मोहिते, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. झेड. के. फैझान, ॲड.…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारत शक्तिशाली आणि बलवान बनविण्याचा संकल्प केलेला आहे. भारतीय म्हणून येणाऱ्या काळात आपल्या देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप, विशेष कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, मंडल अध्यक्ष रवींद्र नांदुरकर, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी, रवींद्र देशपांडे, चिटणीस मधुकर…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताते कर्तृत्ववान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने चिंचवडगावातील गोखले हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे आयोजित विविध लोकोपयोगी योजनांच्या शिबिरात सहभागी झालेल्या हजारो लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजना लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड, आधार स्मार्ट कार्ड व मतदार स्मार्ट कार्डचे चिंचवड विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, भाजपा प्रदेश मुख्यलयाचे प्रभारी  रविंद्र अनासपुरे,  शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते महेश कुलकर्णी, श्रीराम…

Read More

‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोन कार्यालयात शिवसेनेचा दबदबा टिकून’ – राजन भानुशाली राज्य वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक चिंचवडमध्ये संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” संघटीत शक्ती आणखी वाढली पाहिजे; ती वाढण्यापेक्षा एकत्रित राहिली पाहिजे. मुळात या क्षेत्रात जेवढ्या संघटना झालेल्या आहेत, त्यात माझ्यासारख्या आणखी एखाद्याने आणखीन एका संघटनेची त्यात भर टाकून ती संघटीत शक्ती विकृत करण्याचं काम सध्या सर्वत्र केल जात आहे. सुरुवातीला मान्यताप्राप्त आणि एक संघटना अशा दोनच तीनच संघटना होत्या. त्यावेळी देखील शक्ती कोणाकडे होती? त्यापेक्षा ताकदीने याला उत्तर आणि ताकदीने याला न्याय देयचे काम कोण करू शकते? तर शिवसेनेची संघटनाच करू शकते? हे त्यावेळी आम्ही…

Read More