ताज्या घडामोडीपिंपरी

शक्तिशाली व बलवान भारतासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर जगताप  

Spread the love

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारत शक्तिशाली आणि बलवान बनविण्याचा संकल्प केलेला आहे. भारतीय म्हणून येणाऱ्या काळात आपल्या देशाला महासत्ता बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी जगताप, विशेष कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, मंडल अध्यक्ष रवींद्र नांदुरकर, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी, रवींद्र देशपांडे, चिटणीस मधुकर बच्चे, देवदत्त लांडे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, माजी महापौर आर एस कुमार, सचिन बंदी, कामगार आघाडी अध्यक्ष नामदेव पवार, शेखर चिंचवडे, दिव्यांग सेल संयोजक शिवदास हांडे, सहकार सेल संयोजक माधव मनोरे, कायदा सेल सहसंयोजक दत्ता झुळूक, कार्यकारणी सदस्य गणेश वाळूंजकर, बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठ संयोजिका प्रीती कामतीकर, विमल काळभोर, भावना पवार, रेखा काटे,  कोमल गोंडाळकर, जयश्री मकवाना, ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संयोजक विना सोनवलकर, नितीन अमृतकर, रवींद्र प्रभुणे, धरम वाघमारे, राजेंद्र चिंचवडे, विक्रांत नवले, कार्यालय प्रमुख संजय परळीकर यांच्यासह विविध आघाड्या व प्रकोष्ठचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्  शतकानू शतके चिरायू ठेवायचे आहे, असे सांगून शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शंकर जगताप म्हणाले, “भारताने गेल्या ७५ वर्षांत आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.  विविध आव्हानांचा सामना करीत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे. भारताची अर्थव्यवस्था मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत ७-८ % पर्यंत पोहोचविली आहे. देशाने औद्योगिक क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. ऑटोमोबाईल आणि टेक्सटाइल, आयटी, फार्मास्युटिकल क्षेत्रातही मोठी प्रगती झाली असून, शेती क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत.

साक्षरता दर वाढला आहे. आरोग्य क्षेत्रातही भारताने मोठी प्रगती केली असून लोकांचे आयुर्मान वाढले आहे. जगातील सर्वात मोठे रस्ते आणि रेल्वे नेटवर्क भारतात आहे. सर्वच क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताचे जागतिक स्तरावरील स्थान मजबूत झाले आहे.

प्रतिक्रिया…

भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून वेगाने वाढू पाहत आहे. सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. भारताच्या या प्रगतीचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. या प्रगतीची गती वाढवण्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी समृद्ध आणि सुखी भविष्य घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत.

–  शंकर जगताप, शहराध्यक्ष – भाजप पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button