Author: maharashtrabreakingnews.com

निगडी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- संजय कुंभार प्रस्तुत तोच चंद्रमा नभात मराठमोळी कवियत्री शांताबाई शेळके यांच्या गीतांची महफील 4 फेब्रुवारी रविवारी येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित केली आहे. कार्यक्रमाचे आयोजक अमित गावडे आहेत. या महफीलमध्ये ललिता जगदाळे, शृंगेरी भावसार, प्रतिक्षा कुंभार, अरुणा मुळे, राजीवजी पंडित, भारते, कौस्तुभ कुंभार, संदीप बोरकर, विवेक जडे यांच्या सुमुधर आवाज रसिकांना ऐकायला मिळणार आहे. महफीलीचे निवेदन विना कुंभार – दुधगावकर या करणार आहे.यात सहभाग शीतल कुलकर्णी, हेमलता खेडकर, सविता पाटील यांचा असणार आहे. मनोहर पवार, दिलीप वेदपाठक, अँथॉनी यांचे सहकार्य मिळाले असून रमेश खडबडे, योगेश कुंभार यांनी ग्राफिक्स…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अर्थसंकल्पामध्ये कॉर्पोरेट टॅक्स दरात करण्यात आलेली कपात, स्टार्टअप उद्योजकांसाठी आणखी एक वर्ष वाढविण्यात आलेली प्राप्तीकरात सूटची मुदत या निर्णयांचे स्वागत केले आहे. या तरतुदी चेंबरच्या वतीने केंद्र सरकारला सुचविण्यात आल्या होत्या. तसेच अंतरिम अर्थसंकल्प असल्याने पुढील आर्थिक वर्षातील चार महिने जाणार असून याचा उद्योगवाढ, नव्या प्रकल्पावर परिणाम होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. इतर उद्योगांसाठी प्रोत्साहनात्मक या अर्थसंकल्पात काहीही नसल्याचे  पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अभय भोर. चौथी औद्योगिक क्रांती पाहता उद्योगांमध्ये ऑटोमेशन रोबोट टेक्नॉलॉजी जागतिक स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी केंद्र सरकार तर्फे तरतूद दिसून येत नाही वास्तविक उद्योगांसाठी तंत्र प्रशिक्षण केंद्र ही मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे होते. उद्योगांना नवीन बजेट परंतु मुलामा जुनाच आज 2024 चे बजेट अर्थमंत्री निर्मलाजी सितारामन यांनी जाहीर केले परंतु बजेट पाहता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पूर्णपणे बजेट राबविले जात असल्याचे दिसले या बजेटमध्ये अनेक योजनांचा भडिमार जरी करण्यात आला असला तरी वास्तविक याचा उद्योगांना कोणताही भरघोस असा फायदा दिसून येत नसल्याचे दिसते टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार शहरात घर चलो अभियान राबविण्यात येणार असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तीनही मंडलांतर्गत येणाऱ्या ५२८ बुथ कार्यकर्त्यांचे गुरूवारी रहाटणीत संमेलन घेण्यात आले. त्यामध्ये या अभियानाबाबत प्रशिक्षण देऊन बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. देशात सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या योजना, त्या योजनांचा प्रत्यक्षात जनतेला झालेला लाभ नागरिकांपर्यंत धुमधडाक्यात पोहोचवण्याचे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या संमेलनात केले. रहाटणी…

Read More

शेतकरी,लघु उद्योजक, विद्यार्थी,युवक यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अत्यंत व्यवहार शून्य अर्थसंकल्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या केंद्र सरकारच्या या बजेटमध्ये लघुउद्योगाची खूप घोर निराशा झाली असून.लघु उद्योगास कोणतेही प्रकारच्या आर्थिक सवलती देण्यात आले नाहीत.दुष्काळाचे सावट देशावर असताना शेतमालाला भाव नसताना शेतकऱ्यांच्या बी बियाणे खताच्या किमतीमध्ये सवलती सरकारने दिलेल्या नाहीत.त्यामुळे कृषी विकास दर किमान 2 टक्के वाढवा,यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सवलती देण्यात आला नाही. शैक्षणिक बजेटमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.पदवीपर्यंतचे शिक्षणात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही.अन्नधान्य भुसार मालाच्या निगडित असणाऱ्या अप्रत्यक्ष करात देखील कपात करण्यात आलेली नाही. मालवाहतूक आणि उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर होत असताना डिझेलवरील अबकारी…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्यातील शेतकरी, कष्टकऱ्यांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचे हित साधणारा आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा आणि 2047 पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी करणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे. गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. नवनवीन उद्योगासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसाह्य, राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचे ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा यामुळे महाराष्ट्राच्या राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत. देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसेच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला…

Read More

– पायाभूत सोयी-सुविधा होणार सक्षम – भाजपा आमदार महेश लांडगेयांचा विश्वास पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थस्थान श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीच्या मधोमन वसलेले टाळगाव चिखली गावाला आता ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या गावातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलाआहे. मौजे टाळगाव चिखलीला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात दि. १९ मे २०२३ रोजी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी…

Read More

पक्ष उतरला रस्त्यावर, सूडाच्या कारवाईचा निषेध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला. पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन तास ठिय्या मांडून या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे. ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठगमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आकुर्डी येथील मुक्कामाला ३०० हून अधिक वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी येथे वारकरी भवन उभारावे. त्याचप्रमाणे दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी मेट्रोच्या खांबावर संतांचे तैलचित्र, त्यांचे अभंग व वारकरी संप्रदायांशी संबंधित बाबींवर म्युरल्स उभारण्याची सूचना महापालिकेला केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशा मागण्या पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या शिष्टमंडळाने आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात शंकर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अमरधाम स्मशानभूमी निगडी येथील बकालपणा निर्माण झाला आहे.निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे. निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी ह्या ठिकाणी गवत झाडे झुडपे वाढली असून त्या ठिकाणी घुशी उंदीर साप वावर वाढला असून अंत्यविधी करण्यासाठी हजारो नागरिक ह्या ठिकाणी रोज येत असून निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे मच्छर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्या मुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतआहे. निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथील स्वच्छता अभियान राबविण्यात यावे ठेकेदार ह्यांना महानगरपालिका लाखो रुपये साफसफाई करण्यासाठी प्रत्येक महिन्याला देत असून ठेकेदार जाणूनबुजून दुर्लक्ष…

Read More