Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘अब की बार, भाजप तडीपार’ला तुफान प्रतिसाद, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीची घोषणा
ताज्या घडामोडी

‘अब की बार, भाजप तडीपार’ला तुफान प्रतिसाद, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीची घोषणा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com5 March 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण, पनवेल आणि खोपोली तीन सभा

– संजोग वाघेरे यांना निवडून देण्याचे केले आवाहन

पनवेल (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर झाली आहे.  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवार दिनांक 4 मार्च रोजी मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, उरण आणि खापोलीमध्ये सभा घेत संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. गद्दारी करणा-यांना धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना संजोग वाघेरे पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संजोग वाघेरे-पाटील यांच्या पनवेल येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले.  यावेळी गर्दी पाहून उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभेची जागा आपणच जिंकत आलो असून ती आपणच जिंकणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, रायगड आणि मावळ… एका बाजूला छत्रपतींचं जन्मस्थान दुसऱ्या बाजूला छत्रपतींची राजधानी. छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा भगवाच फडकणार आहोत, दुसरं कुठलं फडकं आपण फडकवणार नाहीत.

गद्दारी करणा-यांचा समाचार घेताना उध्दव ठाकरे म्हणाले की, मी गद्दारांना काय दिलं नव्हतं. जे देता येतं ते सगळं दिलं. तरीही तुम्ही आमच्या पाठीत वार केला. इथल्या गद्दार खासदाराची तरी काय ओळख होती. पण शिवसेना हे नाव घेऊन तो तुमच्यासमोर आला. म्हणून, तुम्ही त्याला दोन वेळा निवडून दिलं. पण, आता त्या गद्दाराला आणि सत्तेसाठी पक्ष बदलणा-यांनाही धडा शिकवावा लागणार आहे‌. तर, भाजप हा पक्ष नाही ही एक भ्रष्टाचारी, सडकी, कुजकी वृत्ती आहे. ही वृत्ती देशातून संपवावी लागेल. देशातून ही वृत्ती तडीपार करावी लागेल. तरच अच्छे दिन येतील, असा घणाघात देखील या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी केला.

‘अब की बार, भाजप तडीपार’ला तुफान प्रतिसाद

मावळ लोकसभा मतदारसंघात झालेल्या उध्दव ठाकरे यांच्या तीनही सभांमध्ये त्यांनी “अब की बार… भाजप तडीपार”. हा नारा दिला. उद्धव ठाकरे यांच्या गर्जनेला जनतेने तुफान प्रतिसाद दिला. भाजप तडीपार… आयेगी इंडिया आघाडी सरकार असा उत्स्फूर्त गजर या सभांमध्ये पाहायला मिळाला. यावरून मावळ लोकसभेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय पक्का असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.

सर्वांच्या साथीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न तडीस लावू – संजोग वाघेरे

पनवेल येथील सभेत बोलताना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांनी विकासकामांचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी एकही काम मतदारसंघात केलेले नाही. पनवेल शहरात पाण्याची समस्या आहेच, परंतु याठिकाणी एकही आरोग्य केंद्र, रूग्णालय नाही. अनेक प्रश्न जैसे थे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जण काम करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघातील प्रश्न मार्गी तडीस लावू. माझ्वयाकडे मावळ लोकसभा मतदारसंघात संघटक म्हणून जबाबदारी दिली. ती जबाबदारी मिळाल्यानंतर आपण मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधला आहे. लोकसभेला मावळ लोकसभेमधून उध्दव ठाकरे यांच्याच विचाराचा उमेदवार निवडून येईल, असा निर्धार सर्वांनी केलेला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविद्यार्थ्यांनी नाविण्याची कास अंगिकारून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची जिद्द बाळगावी- डॉ. रविंद्र जायभाये
Next Article जुनी सांगवी येथील कै. बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव गुरूवारपासून नागरिकांसाठी खुला
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.