Author: maharashtrabreakingnews.com

रावेत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या भोवतीचे प्रतिबंधित क्षेत्र अर्थात रेड झोन कमी करण्याचा निर्णय घेऊन केंद्रातील मोदी सरकारने किवळे, रावेत भागातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे, असे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी सांगितले. खासदार बारणे यांनी  रावेत परिसरातील काही लोकप्रतिनिधी व मान्यवरांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. नामवंत उद्योजक नंदकुमार भोंडवे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.‌ त्यावेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख नीलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, देहूगाव शहर प्रमुख सुनील हागवणे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील मराठवाडास्थित नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 2012 मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा जनविकास संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरवमधील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्र शासनाने दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला, या ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व गुढीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ प्रबोधनकार शारदा मुंडे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, सुर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, दिलीप बारडकर देशमुख, अभिमन्यू गाडेकर, बळीराम माळी, नितीन…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर विकसित भारताच्या वाटचालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे!” असे विचार भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी  निगडी  व्यक्त केले. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी नूतन वर्षानिमित्त मनोमिलन समारंभ २०२४चे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात खासदार श्रीरंग बारणे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव अमित गोरखे, पिंपरी – चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर आर. एस. कुमार, अनुप मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भारती फरांदे, ह. भ.  प. किसनमहाराज चौधरी, सलीम शिकलगार, सरिता साने, शैला पाचपुते, राधिका बोर्लीकर, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीजवळील मैदानात करण्यात आले आहे. या विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवशी टीम डिव्हाईनच्या वतीने मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांनी मतदानाची शपथही घेतली. या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, टीम डिव्हाईनचे निखिल भोसले, प्रमोद फंदे, गणेश भिसे, राजवर्धन नाथभजन, रोशन खळगे, दिलीप पाडाळे, रितेश कडलक तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या लोकशाहीकडे पाहिले जाते. या…

Read More

पीसीईटी आयोजित दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे उद्घाटन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये तरुणांनी मतदार नोंदणी करून भरघोस मतदान करावे आणि लोकशाही सुदृढ करावी. ग्रामीण भागांमध्ये मतदानासाठी उत्साह असतो मात्र शहरात निरुत्साह दिसून येतो; ही नकारात्मक भावना दूर करून तरुणांनी आपल्यासह समाजातील सर्व घटकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक साक्षरता मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड, वर्शिप अर्थ फाउंडेशन, इन्फिनिटी ९०.४ एफ एम यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे 15 वा पदवीप्रदान या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्र्पती मा. रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी  सोमनाथ एस. अध्यक्ष – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), बेंगळुरू यांना त्यांच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी आणि सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष तसेच सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलपती – प्रा. डॉ. एस.बी. मुजुमदार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी माजी राष्ट्र्पती मा. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी, पुणे चे कुलपती मा.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘महामानव’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख प्रिया हिबारे, स्वाती कारवाल पाहुणे तसेच संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,शाळेच्या मुख्याध्यापिका नाजमीन शेख उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता सातवीच्या मुलींनी भीमराज की बेटी, पाचवी आणि सहावीच्या मुलींनी नांदण- नांदण या गाण्यावर नृत्य केले  या महान कार्यक्रमाचे औचित्य साधत शाळेमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धे व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या…

Read More

  पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आणि ज्येष्ठ लोकनेते शरदचंद्र पवार साहेब व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांना लोकसभेत पाठवण्याचा निश्चय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका शुक्रवारी (दि.12) घेण्यात आल्या. दापोडी, महेशनगर, पिंपरी, वाल्हेकरवाडी आणि किवळे येथील मुकाई चौक या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. बैठकीस महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.…

Read More

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे निलख, गणेशनगर येथील सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्कलकोट स्वामी समर्थांच्या प्रकटन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सचिन साठे यांनी दिली. स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आठवडाभर भजन सप्ताहाचे आयोजन केले होते. यानिमित्त पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी उपस्थित राहून भजन सेवा केली. तसेच बुधवारी स्वामी समर्थांच्या प्रकटन दिना पहाटे श्रींना महाअभिषेक, त्यानंतर होम हवन करण्यात आले. संध्याकाळी स्वामी समर्थांच्या पालखीची परिसरातून ग्रामप्रदक्षिणा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी पिंपळे निलख पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आम्ही १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उत्सुक असून या निवडणुकीत प्रथमच मतदान करणार असल्याने हा क्षण ऐतिहासिक होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत त्यासाठी जास्तीत जास्त मित्र परिवारात,नातेवाईकांत मतदानाचा प्रचार करून आम्ही आमचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू असा विश्वास निगडी येथील मैत्री ग्रुपच्या नवोदित पन्नासहून अधिक महाविद्यालयीन नवोदीत मतदारांनी व्यक्त केला. आकुर्डी,प्राधिकरण व परिसरातील म्हाळसाकांत कॉलेज, प्रा.रामकृष्ण मोरे कॉलेज,डॉ. डी वाय पाटील कॉलेज या महाविद्यालय विद्यार्थ्यां-विद्यार्थीनींचा स्नेह मेळावा सेक्टर २६ मधील एका हॉटेलमध्ये संपन्न झाला,त्यावेळी २०६ पिंपरी विधानसभा कार्यालयाचे नोडल अधिकारी विजय भोजने,मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक तसेच राजेंद्र कांगुडे, दिनेश जगताप, महालिंग मुळे आदी सहका-यांनी…

Read More