न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ‘महामानव’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘महामानव’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख प्रिया हिबारे, स्वाती कारवाल पाहुणे तसेच संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,शाळेच्या मुख्याध्यापिका नाजमीन शेख उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता सातवीच्या मुलींनी भीमराज की बेटी, पाचवी आणि सहावीच्या मुलींनी नांदण- नांदण या गाण्यावर नृत्य केले या महान कार्यक्रमाचे औचित्य साधत शाळेमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धे व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. निबंध स्पर्धेत इयत्ता सातवी मधील पूजा गुप्ता या विद्यार्थाने पहिले पारितोषिक मिळवले तर दर्शिता तलवारे हिने दुसरा व आनंद बागबाल याने तिसरा नंबर पटकवला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये सोहम गायकवाड पहिला दुसरा मंथन जाधव आणि तिसरा नदीम रजा या विद्यार्थ्यांनी पटकावला, फॅन्सी ड्रेस मध्ये पहिला सार्थक ननवरे दुसरा ईशानी सोळुंके आणि तिसरा आरुष निकम या विद्यार्थ्यांनी पटकावला, रांगोळी स्पर्धेमध्ये पहिला आकृती तिवारी आणि दुसरा यशस्वी घोटेकर या विद्यार्थ्यांनी पटकावला. रजा नदीम, मंथन जाधव, आरुष हिबारे सोहम गायकवाड, वाघ श्रेया, मटके संस्कार, सोळुंके श्रावणी, साबळे सृष्टी, नम्रता सावंत, लोणकर यशस्वी, परचानी जीविका, मनीषा चौधरी, कांबळे स्वरा, अस्मी करवल यांनीही बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल भाषण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला विश्वजीत काटे यांने पोवाडा गायन केले, रेणु राठी, सोनाली पाटील आणि अनिता रोडे यांनी इंग्रजी, मराठी, हिंदी मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका निशा पवार मॅडम व जयश्री घोलप मॅडम यांनी आभार मानले.