Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घराला लागलेल्या आगीत घरगुती साहित्य खाक झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दीड तासांच्या अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. चिंचवड येथे शाहूनगरमधील एमआयडीसीच्या जी ब्लाॅकमध्ये आर्यनम सोसायटीत सोमवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहुनगर येथील आर्यनम सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार महापालिकेचे पिंपरी केंद्राचे, प्राधिकरण, तळवडे तसेच चिखली उप अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटमधून आगीचे लोळ व धुराचे लोट निघत होते. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत सोसायटीमधील इतर फ्लॅटमधील धूर कमी होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत किचनमधील दोन…

Read More

नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नाटकाशी माझी नाळ जोडलेली आहे. आपण जे नाटक पाहतो त्यात खूप आनंद आणि समाधान मिळून जाते, असे प्रतिपादन अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील गोळवलकर मैदान येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ‘कला गौरव पुरस्कार’ महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्धन रणदिवे, नाट्य…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर हाेणार ? या संदर्भात मागील अनेक दिवसांपासून चर्चांना उधाण आले हाेते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. २१ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर हाेणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. परीक्षा दिलेल्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. बारावी परीक्षेचे दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,…

Read More

चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – जैन श्वेतांबर  उच्च शिक्षीत वधूवर परिचय मेळावा आणि पुस्तक  प्रकाशन सोहळा पुणे येथील नंदु भवन हॉल कोंढवा बुद्रुक येथे १६ जुन रोजी होणार आहे. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील व भारतातील  उच्चशिक्षित वधू वरांनी नाव नोंदणी २५ मे पूर्वी करावी असे आवाहन जैन श्वेतांबर समाजाचे पिंपरी चिंचवडचे स्थानीक प्रतिनिधी किरण शहा यांनी केले आहे. जैन वधुवर परिचय संस्था, पुणे यांच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम  राबविले जातात. यासंस्थेच्या वतीने १९वा उच्चशिक्षीत वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी समाजातील उच्चशिक्षीत मुलामुलींची नोंदणी समाज बांधवानी २५ मेपुर्वी ऑनलाईन (www.jainvadhuvarsansthapune.com) पद्धतीनुसार करावी. असे आवाहन किरण शहा यांनी…

Read More

मधुश्री व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भारत सक्षम देश व्हावा असे सर्वांनाच वाटते म्हणून बलशाली राष्ट्रासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा!” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बिबीकर यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक १७ मे २०२४ रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘शिवाजीराजे जन्माला यावेत पण शेजारच्या घरात’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना शिल्पा बिबीकर बोलत होत्या. माजी महापौर आर. एस. कुमार अध्यक्षस्थानी होते; तसेच मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार, सचिव…

Read More

मधुश्री व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “सुख आणि दुःख कृष्णार्पण करणे हाच गीतासार आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी  निगडी प्राधिकरण येथे  व्यक्त केले.  मधुश्री कला आविष्कार आणि स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘गीतासार – जगण्याचा आधार’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना राज अहेरराव बोलत होते. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, मधुश्रीच्या अध्यक्ष माधुरी ओक, सचिव राजेंद्र बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानापूर्वी, आदर्श गृहरचना संस्था म्हणून निसर्गदर्शन, स्वप्नपूर्ती फेज -…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत बसविण्यात आलेल्या नवीन विद्युत दाहिनीचे काम पूर्ण झाले असून, ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, निगडीतील स्मशानभूमीतील जुनी विद्युत दाहिनी चिमणी नादुरुस्त झाली होती. तसेच जुनी विद्युत दाहिनी खूप गरम होत होती. त्यामुळे जुन्या विद्युत दाहिनीमध्ये मर्यादित अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या स्मशानभूमीत नवीन विद्युत दाहिनी बसविण्यासाठी गेल्या एक ते दीड वर्षापासून काम सुरू होते. आता हे काम पूर्ण झालेले आहे. मात्र फक्त राजकीय नेते मंडळींच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश आर.एस.वानखेडे (प्रमुख न्यायाधीश), आर.एम गिरी, पी.सी.फटाले, एस.पी.कुलकर्णी यांच्या विविध ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. त्या निमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम मध्ये निरोप समारंभ तसेच सालाबाद प्रमाणे आईस्क्रीम पार्टीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. न्यायाधीश आर.एस.वानखेडे (प्रमुख न्यायाधीश), आर.एम गिरी, पी.सी.फटाले, व्ही.एन.गायकवाड,ए.एम. बगे साहेब, यांचे सत्कार असोसिएशन चे आजी माजी पदाधिकारी व जेष्ठ वकील मान्यवर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.या वेळी ॲड.जे.के काळभोर, माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.प्रतिक जगताप, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे, ॲड.राकेश अकोले, ॲड.समीर चव्हाण, ॲड.प्रताप साबळे, ॲड.संभाजी वाघमारे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवण्यात यावेत , अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (aimim )पक्षाचे धम्मराज साळवे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घाटकोपर (मुंबई) येथील होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे मागील काळात रावेत याठिकाणी घडलेली होर्डिंग दुर्घटना ,पुणे येथे घडलेली होर्डिंग दुर्घटना यांची पुन्हा वेळीच दखल घेणे गरजेचे आहे ..मोशी येथे अधिकृत असणारा होर्डिंग स्ट्रक्चर देखील जाहिरातदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि आपल्या विभागाच्या दुर्लक्षामुळे वादळवाऱ्याने पडला . जाहिरात फलकाचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आकाशचिन्ह व परवाना विभागास सादर करणे बंधनकारक आहे. जाहिरात फलकाना…

Read More

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “मानवाच्या अंतरमनात डोकावण्याची ताकत कवीच्या लेखनात असते. अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. फ. मु. शिंदे यांच्या कवितांमध्ये विश्व कारुण्य दिसते. वाट पाहण्याची, सहनशीलतेची क्षमता असणाऱ्या फ. मु. यांच्या ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहात माणसाच्या जीवनाचे अप्रतिम दर्शन घडते. रसिकांना घडवण्याचे, समृद्ध करण्याचे काम यातून होत आहे. त्रिकाल सत्य सांगणाऱ्या या कविता आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा-कादंबरीकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत ससाणे यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे व न्यू ईरा…

Read More