पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश आर.एस.वानखेडे (प्रमुख न्यायाधीश), आर.एम गिरी, पी.सी.फटाले, एस.पी.कुलकर्णी यांच्या विविध ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. त्या निमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम मध्ये निरोप समारंभ तसेच सालाबाद प्रमाणे आईस्क्रीम पार्टीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
न्यायाधीश आर.एस.वानखेडे (प्रमुख न्यायाधीश), आर.एम गिरी, पी.सी.फटाले, व्ही.एन.गायकवाड,ए.एम. बगे साहेब, यांचे सत्कार असोसिएशन चे आजी माजी पदाधिकारी व जेष्ठ वकील मान्यवर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.या वेळी ॲड.जे.के काळभोर, माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.प्रतिक जगताप, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे, ॲड.राकेश अकोले, ॲड.समीर चव्हाण, ॲड.प्रताप साबळे, ॲड.संभाजी वाघमारे यांनी बदली झालेल्या साहेबांसंदर्भात मनोगत व्यक्त करून साहेबांबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा तिडके – कांबळे, सदस्य ॲड.जयेश वाकचौरे, ॲड.साक्षी धुमाळ, ॲड.तेजश चवरे, ॲड.विशाल पौळ यांच्याकडून करण्यात आले.
यावेळी ॲड.संजना माने, ॲड.माणगावकर, ॲड.संगीता कुशलकर, ॲड. पूनम शर्मा, ॲड.शीला दळवी, ॲड.नारायण थोरात, ॲड.अधिक चरेगावकर, ॲड.पवन गायकवाड, ॲड.वाघुडे, इ.वकील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे यांनी केले आभार प्रदर्शन ॲड.गोरख कुंभार यांनी केले.

















